शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:18 IST

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर मोदी सरकार आणखीच अडचणीत आले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर मोदी सरकार आणखीच अडचणीत आले आहे. या व्यवहारात अनिल अंबानी यांना आणण्यात भारत सरकारची शिफारसच कारणीभूत होती, असे ओलांद यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, राफेलच्या सौद्यात पंतप्रधान मोदी यांनी स्वत: केला आणि त्यांनीच त्यात हा बदल केला. हे सारे बंद दरवाजाआड झाले. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी हे उघड केल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. मोदी यांनीच दिवाळखोर अनिल अंबानी यांना या कोट्यवधीच्या सौद्यात सहभागी केल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी देशाशी धोका केला आहे, असा आरोपही त्यांनी केला ं्रआहे.अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सचे नाव मोदी सरकारनेच सुचविले होते, असेही ओलांद यांनी म्हटले आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स एंटरटेनमेंट व ओलांद यांचे मित्र ज्युली गेयेट हे संयुक्तपणे चित्रपटनिर्मिती करीत आहेत, हेही इथे महत्त्वाचे ठरेत.ओलांद यांच्या स्पष्टिकरणानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, आता खोटेपणा उघड झाला आहे. चौकीदार केवळ भागीदार नसून, गुन्हेगारही आहे.सुरजेवाला म्हणाले की, एचएएल या सरकारी कंपनीला दूर करून रिलायन्सला ३0 हजार कोटींच्या व्यवहारात फायदा मिळवून देण्यात आपला काही संबंध नाही, असा खोटा दावा मोदी सरकार सातत्याने करीत होती. पण ओलांद यांच्या एका मुलाखतीने सारा खोटेपणा समोर आला आहे.ओलांद यांच्या वक्तव्यानंतर संरक्षण मंत्रालयही खडबडून जागे झाले. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी जे म्हटल्याचे सांगण्यात येत आहे, ते आम्ही तपासून पाहत आहोत. त्यापूर्वी याविषयी काहीही सांगता येणार नाही.ओलांद यांच्या हवाल्याने प्रकाशित झालेल्या लेखामध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सला मोदी सरकारच्या शिफारसीमुळेच ३0 हजार कोटींच्या व्यवहारात सहभागी करून घेण्यात आल्याचे म्हटले आहे. बहुधा याची माहिती राहुल गांधी यांना आधीच होती. त्यामुळे काही दिवस आधी राहुल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, मोदीजी, सावधान, राफेलवरून मोठा वाद निर्माण होणार आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील