शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या नाराज अभियंत्याचा वरिष्ठाच्या पत्नीवर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 02:24 IST

तो रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यांची देखभाल व दुरुस्ती करणा-या कार्यशाळेत कामाला होता. त्याने कोटा येथील रेल्वे वर्कशॉप कॉलनीत उपमुख्य तांत्रिक अभियंता प्रमोदकुमार सिंग याच्या पत्नीवर हल्ला केला. ही घटना सोमवारी घडली.

कोटा : दोन वर्षांपूर्वी बजावण्यात आलेल्या खात्यांतर्गत नोटिसीमुळे नाराज असलेल्या रेल्वेच्या एका अभियंत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ४५ वर्षीय पत्नीवर घरात घुसून हल्ला केल्याची घटना येथे घडली. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, शिवप्रकाश मीणा (४५) असे हल्लेखोर अभियंत्याचे नाव आहे. तो रेल्वेच्या मालगाडीच्या डब्यांची देखभाल व दुरुस्ती करणा-या कार्यशाळेत कामाला होता. त्याने कोटा येथील रेल्वे वर्कशॉप कॉलनीत उपमुख्य तांत्रिक अभियंता प्रमोदकुमार सिंग याच्या पत्नीवर हल्ला केला. ही घटना सोमवारी घडली.कोटा येथील मुख्य कार्यशाळा व्यवस्थापकांनी (सीडब्ल्यूएम) सांगितले की, आरोपी अभियंत्यास सोमवारी सायंकाळीच निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी मात्र त्याला अद्याप अटक केलेली नाही.रेल्वे कॉलनी पोलीस ठाण्याचे प्रभारी हंसराज मीणा यांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात भादंवि ३४१, ३२३ आणि ३५४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.>सहकाऱ्यांशी गैरवर्तणूकदोन वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांत आपल्या सहकाºयांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप शिवप्रकाश मीणा याच्याविरुद्ध आहे.याप्रकरणी प्रमोदकुमार सिंग यांनी त्यास सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. यावरून मीणा हा सिंग यांच्यावर नाराज होता. सोमवारी दुपारी तो सिंग यांच्या घरात घुसला. तेथे त्याने त्यांच्या पत्नीस धक्का देऊन खाली पाडले.