शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 17:31 IST

Who is Jawhar Sircar : कोलकातामध्ये महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी सरकारवर संताप व्यक्त केला आणि तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला.

Jawhar Sircar : कोलकातामधील आरजी कर रुग्णालय आणि महाविद्यालयात एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेबद्दल ममता बॅनर्जी आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करत तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे जवाहर सरकार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ते कोण आहेत, हेच जाणून घ्या.

ममता बॅनर्जींना जवाहर सरकार यांनी काय सुनावले?

जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जींना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे.  "आरजी कर रुग्णालयात झालेल्या भयंकर घटनेपासून मी महिनाभर संयम पाळला. आंदोलन करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांसोबत ममता बॅनर्जी पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप करतील, अशी आशा मला होती. असे झाले नाही. सरकार ज्या उपाययोजना करत आहे, त्या तोकड्या असून, त्यालाही उशीर झाला आहे. मला वाटतं की, जर भ्रष्ट डॉक्टरांचा ग्रुप तोडले गेले असते आणि दोषींना तात्काळ शिक्षा झाली असती, तर या राज्यात खूप आधीच परिस्थिती सामान्य झाली असती", अशा शब्दात जवाहर सरकार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

खासदारकीचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा

तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देताना राजकीय संन्यासाचीही घोषणा केली. जवाहर सरकार यांनी अनेक पदांवर काम केले आहे. जवाहर सरकार हे आयएएस अधिकारी होते. 

1975 मध्ये ते IAS सेवेत दाखल झाले होते. 2012 ते 2016 या काळात ते प्रसार भारतीचे सीईओ होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणूनही गौरवण्यात आलेले आहे. 

जवाहर सरकार केंद्रात होते सचिव

2008 ते 2012 या काळात जवाहर सरकार हे भारत सरकारमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्याचे सचिव म्हणून काम केले आहे. निवृत्तीनंतर ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार बनले. 2021 मध्ये ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडले गेले होते. 

जवाहर सरकार यांचे शिक्षण

72 वर्षीय जवाहर सरकार यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातच झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव नंदिता सरकार आहे. त्यांना एक मूल आहे. प्रेसिडन्सी, कँब्रिज आणि Sussex विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्र या दोन विषयात एमए केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाPoliticsराजकारणMember of parliamentखासदार