शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात केमिकल कारखान्यातून वायू गळती; आसपास राहणारे कित्येक जण घरातच बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 10:14 IST

केमिकल कारखान्यातून पसरलेल्या वायूचा परिणाम ३ किलोमीटरच्या परिसरात; अनेकांवर उपचार सुरू

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या केमिकल कारखान्यातून वायू गळती झाल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. विशाखापट्टणममध्ये असलेल्या आर. एस. व्यंकटपुरम गावातल्या एलजी पॉलिमर उद्योग कारखान्यातून वायू गळती झाली. मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. वायू गळती होताच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केमिकल कारखान्यातून वायू गळती सुरू होताच परिसरात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. केमिकल कारखान्यातून पसरलेल्या वायूचा परिणाम ३ किलोमीटरच्या परिसरात जाणवत असल्याची माहिती पश्चिम विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त स्वरुपा रानी यांनी दिली. वायू गळतीची माहिती मिळताच अनेक जण केमिकल कारखान्याच्या परिसरात पोहोचले. विषारी वायूमुळे त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली. विषारी वायूची तीव्रता अतिशय जास्त असल्यानं आसपास राहणारे काही जण घरातच बेशुद्ध पडले. यामध्ये लहान मुलांची आणि वृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती स्वरुपा राणी यांनी दिली.