शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक हजेरीतून आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना सूट नाही; वादग्रस्त गुंतवणुकीचे खटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:18 IST

यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांत जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली होती

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या कंपन्यांमध्ये झालेल्या वादग्रस्त गुंतवणुकीच्या खटल्यांमध्ये सुनावणीच्या वेळेस वैयक्तिक हजेरीतून सूट मिळावी यासाठी त्यांनी केलेला अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.

त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी २००४ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना, त्यांची मेहेरनजर व्हावी या हेतूने काही जणांनी जगनमोहन यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, असा आरोप आहे.

आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने अनेक कामांमध्ये व्यग्र असल्याने या प्रकरणांच्या खटल्यातील सुनावणीला प्रत्येक वेळेस हजर राहणे शक्य नाही, असा जगनमोहन रेड्डी यांचा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. वैयक्तिक हजेरीतून सूट दिल्यास जगनमोहन रेड्डी यांना हवे ते करण्याची मुभा मिळेल. सत्ता, पैसा व बळाच्या जोरावर ते या खटल्यांतील साक्षीदारांवर प्रभावही टाकू शकतील, असे सीबीआयतर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

गुंतवणुकीसंदर्भातील प्रकरणांमध्ये जगनमोहन रेड्डी यांना मे २०१२मध्ये अटक करण्यात आली होती. चंचलगुडा येथील तुरुंगात १५ महिने ठेवण्यात आल्यानंतर जगनमोहन यांची न्यायालयाने सप्टेंबर २०१३मध्ये जामिनावर सुटका केली. या खटल्यांतील साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये, अशी ताकीद न्यायालयाने जगनमोहन यांना जामीन मंजूर करताना दिली होती.या खटल्यांच्या प्रत्येक सुनावणीला त्यांनी न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे, असेही न्यायालयाने बजावले होते. या प्रकरणांमध्ये सीबीआयने ११ आरोपपत्रे दाखल केली असून, त्याला पुरवणी आरोपपत्रेही जोडली आहेत. वादग्रस्त पार्श्वभूमीयंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांत जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाचा पराभव करून सत्ता मिळविली होती. मात्र, जगनमोहन यांची आधीची राजकीय कारकीर्द अत्यंत वादग्रस्त असून, त्यामुळे त्यांच्या कारभाराकडे विरोधक नेहमीच संशयाने पाहत असतात.