शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

... अन् गर्भवतीला मिळाले घराजवळचे परीक्षा केंद्र; हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 07:50 IST

न्यायाधीश होण्याच्या इच्छेचा कोर्टाकडून सन्मान

बंगळुरू : आठ महिन्यांच्या गर्भवती महिला उमेदवाराला दिवाणी न्यायाधीश होण्याची परीक्षा द्यायची होती, मात्र तिला बंगळुरू शहरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे या महिलेला तिच्या मूळ गावी, मंगळुरूमध्येच परीक्षेला बसण्याची परवानगी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली. 

कोर्टाने ५७ न्यायाधीशांच्या भरतीसाठी यावर्षी मार्चमध्ये अधिसूचना जारी केली होती. ६ हजारपेक्षा अधिक उमेदवारांतून १,०२२ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. ही मुख्य  परीक्षा बंगळुरूमध्ये शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आली आहे. 

समितीत कोण? nदिवाणी न्यायाधीशांच्या थेट भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या समितीमध्ये न्यायमूर्ती पीएस दिनेश कुमार, न्यायमूर्ती के सोमशेखर, न्यायमूर्ती एस. सुनील दत्त यादव, न्यायमूर्ती अशोक एस. किनागी आणि न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांचा समावेश होता.nत्यांनी नेत्रावतीच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला दक्षिण कन्नड जिल्ह्यात परीक्षा देण्याची परवानगी दिली.

अर्जात काय होते? दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील वकील नेत्रावती यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. गर्भवती असल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंगळुरूला जाणे शक्य नसल्याने जिल्ह्यातच परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

केवळ एका परीक्षार्थीसाठी...सरन्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे यांनी समितीच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. समिती आणि मुख्य न्यायमूर्तींच्या निर्देशानंतर, उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी मंगळुरू येथील जिल्हा न्यायालयात केवळ एका परीक्षार्थीसाठी परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात एका महिला न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयexamपरीक्षाHigh Courtउच्च न्यायालय