शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक

By बाळकृष्ण परब | Published: December 01, 2020 7:13 PM

Indian Army News : नगरोटा येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे. नगरोटा येथे मारले गेलेले दहशतवादी भुयारातून भारतात घुसले होते. या भुयारांमधूनच भारताच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीमध्ये सुमारे २०० मीटरपर्यंत धडक मारली.केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांचे जवान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत सुमारे २०० मीटरपर्यंत आत गेले होते. हे जवान भुयाराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचले होते. नगरोटा येथे मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनी याच भुयाराचा वापर करून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती.

जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापर केलेल्या १५० मीटर भुयाराचा शोध सुरक्षा दलांनी घेतला होता. दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून फोन जप्त करण्यात आले होते. या फोनमधूनच या भुयाराची माहिती मिळाली होती.बीएसएफ जम्मूचे फ्रंटियर, इन्स्पेक्टर जनरल एनएस जामवाल यांनी सांगितले की, असे वाटते की, नगरोटा एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी १५० मीटर लांब असलेल्या या भुयाराचा वापर को होता. कारण हे भुयार हल्लीच तयार केलेले आहे. तसेच या दहशतवाद्यांना मार्ग दाखवणारा कुणीतरी वाटाड्या होता. तोच त्यांना महामार्गापर्यंत घेऊन गेला असावा.या भुयाराचे तोंड दाट झाडीमध्ये खबरदारीपूर्वक लपवण्यात आले होते. त्यावर माती आणि रानटी झाडे टाकून ते झाकण्यात आले होते. भुयाराचे तोंड मजबूत करण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानी चिन्हे असलेल्या वाळूच्या पिशव्या होत्या. हे नव्याने खोदलेले भुयार होते. तसेच त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला होता. दरम्यान , येथून भरतात घुसलेले दहशतवादी नगरोटा येथे मारले गेले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPOK - pak occupied kashmirपीओके