शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनाग पोटनिवडणूक रद्द करा - गिलानी

By admin | Updated: April 20, 2017 22:13 IST

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 20 -  जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी केली आहे. 
अधिका-यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून दक्षिण काश्मीरमध्ये होणारी पोटनिवडून रद्द केली पाहिजे. यामुळे घाटीमध्ये घडणा-या दगडफेकी सारख्या हिंसक घटना कमी होतील, अशी शक्यता सय्यद अली शाह गिलानी यांनी वर्तविली आहे. 
काश्मीर खोऱ्यातील स्थिती तणावपूर्ण असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिली. ही पोटनिवडणूक उधळून लावण्यासाठी हिंसक कारवाया होण्याची शक्यताही राज्य सरकारने वर्तविली होती. यानंतर अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी  12 एप्रिलला होणारी पोटनिवडणूक आयोगाने 25 मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
श्रीनगर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या मतदानावेळी शहरात काही नागरिकांकडून अभूतपूर्व हिंसाचार घडविण्यात आला. मतदान केंद्रेच ताब्यात घेऊन लो‌कशाही प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिंसक नागरिकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.