शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गांधी कुटुंबातील एकही सदस्य अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होणार नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 22:05 IST

Anant Radhika Wedding: मुकेश अंबानी यांनी स्वतः सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते.

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चं उद्या, म्हणजे 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची तयारी सुरू असून, देश-विदेशातील नामांकित व्यक्ती या शाही सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी स्वतः अनेकांच्या घरी जाऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले आहे. यात गांधी कुटुंबाचाही समावेश आहे. पण, गांधी कुटुंबातील कोणीही या लगाला उपस्थित राहणार नाही.

मुकेश अंबानी यांनी स्वत: निमंत्रण दिले होते मुकेश अंबानी यांनी 4 जुलै 2024 रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. यावेळी मुकेश यांनी संपूर्ण गांधी कुटुंबाला लग्नाला येण्याचे आवाहन केले होते. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नाला गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

दरम्यान, गेल्या महिन्यात 26 जून रोजी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. याशिवाय, त्यांनी बॉलिवूड, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. देश-विदेशातील अनेक दिग्गज अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर गुरुवारी (11 जुलै) मुंबईला रवाना झाल्या आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये होणार आहे. यानंतर 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ आहे. 5 जुलै रोजी संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या जस्टिन बीबरनेही परफॉर्म केले होते. यानंतर 8 जुलै 2024 रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता सर्वांच्या नजरा उद्या होणाऱ्या भव्य लग्न सोहळ्यावर आहेत.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRahul Gandhiराहुल गांधीanant ambaniअनंत अंबानीSonia Gandhiसोनिया गांधी