शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra: कंबरेभर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून काढली बोलेरो कार; खुद्द आनंद महिंद्राही झाले हैराण, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:55 IST

महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Anand Mahindra: गुजरातच्या सौराष्ट्र परिसरात तुफान पावसामुळे परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राजकोट आणि जामनगर परिसरात रस्त्यांना नद्यांचं रुप प्राप्त झालं आहे. सखल भागांत ४ ते ५ फूट पाणी साचलं आहे. या सर्व संकटांचा सामना करत पोलीस प्रशासन आणि बचाव पथकं पूरग्रस्त भागात मदत पोहोचवत आहेत. अशातच महिंदा कंपनीच्या बोलेरो कारचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

जामनगर आणि राजकोटमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्स देखील मदत घेण्यात येत आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की जणू रस्त्यांनाही नद्यांचं रुप प्राप्त झालं आहे. 

प्रचंड पाण्याच्या वेगात सहज पार झाली बोलेरो कारट्विटरवर एका व्यक्तीनं गुजरातमधील पुराच्या पाण्यातून एक कार चालक आपली बोलेरो कार चालवल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. रस्त्यावर नदीच्या प्रवाहाप्रमाणं वेगानं पाणी वाहत असताना त्यातूनच बोलेरो कार सहजपणे घेऊन जाताना दिसत आहे. संबंधित कार एक पोलीस वाहन असून नागरिकांच्या मदतीसाठी जात असल्याचं सांगितलं जात आहे. 

बोलेरो कार जवळपास चार ते पाच फूट पाण्यात आहे. पाण्याचा वेगही प्रचंड आहे. तरीही कार बंद न पडता पाण्याच्या वेगाचा प्रतिकार करत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. नेटिझननं हा व्हिडिओ गुजरात पोलीस, राजकोटचे जिल्हाधिकारी आणि महिंद्रा अँड महिंदा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग केला आहे. 

"महिंद्रा है तो मुमकिन है", अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आनंद महिंद्रांनी देखील हा व्हिडिओ रिट्विट केला असून त्यावर "खरंच की काय? हा आत्ताच्या पावसातला व्हिडिओ आहे का? मी खरंच आश्चर्यचकीत झालोय", अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राGujaratगुजरातfloodपूर