शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra Nitin Gadkari : गाड्या धावतील, वीज निर्मिती होईल; आनंद महिंद्रांनी गडकरींना विचारलं, "हे भारतात शक्य आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 23:44 IST

Anand Mahindra Nitin Gadkari : आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला एक व्हिडीओ.

Anand Mahindra Nitin Gadkari : दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते काही ना काही आपल्या सोशल मीडियावरून शेअरही करत असतात. आनंद महिंद्रांनी नुकतंच केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. "इस्तांबूल टेक्निकल युनिव्हर्सिटी (Istanbul Technical University) द्वारे रस्त्यांवर विंड टर्बाइन लावण्यात आले आहेत. गाड्यांच्या वेगामुळे निर्माण होण्याच्या हवेच्या मदतीनं हे टर्बाइन फिरतात. भारतातील गाड्यांची ये जा पाहता आपणही पवन ऊर्जेत जागतिक ताकद बनू शकतो. गडकरीजी.. आपण हे आपल्या रस्त्यांवर आणि महामार्गांवर लावू शकतो का?," असा सवाल त्यांनी केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी एरिक सोलहीम यांच्या ट्वीटला रिट्वीट करत गडकरी यांना हा प्रश्न विचारला आहे. एरिक सोलहीम ग्रीन बेल्ट अँड रोड इन्स्टीट्यूटचे प्रेसिडेंट आहेत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं टर्बाइनच्या शेजारून जितक्या गाड्या वेगानं जातात, त्याच्या माध्यमातून तयार होणाऱ्या हवेमुळे ते तेजीनं फिरतात. यामुळे वीज निर्मिती होते. इस्तांबुलमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसंच याचं कौतुकही होत आहे. या टर्बाइनचं नाव ENLIL असं आहे. हवेच्या माध्यमातून ते तेजीनं फिरतात. याशिवाय त्यांच्यावर सोलार पॅनल्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेचीही निर्मिती होते. याचाच अर्थ एक यंत्र दोन प्रकारे वीजनिर्मिती करत आहे. याचं काम इस्तांबुल टेक्निकल युनिव्हर्सिची अँड टेक फर्म डेवेसीटेकनं केलं आहे.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राNitin Gadkariनितीन गडकरी