(निनाद) शेळगाव बसस्थानाची दुरवस्था
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
निमगाव केतकी : शेळगाव (ता. इंदापूर) येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
(निनाद) शेळगाव बसस्थानाची दुरवस्था
निमगाव केतकी : शेळगाव (ता. इंदापूर) येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. इंदापूर-बारामती मार्गालगत शेळगाव आहे. या ठिकाणी बसथांब्यासाठी जुनी इमारत आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. या बसस्थानकावर टाकण्यात आलेला पत्रा खाली तुटून लोंबकळत आहे. या बसस्थानकामध्ये अनेक काटेरी झुडपे उगवल्याने हे बसस्थानक प्रवाशांना बसण्यासाठी व थांबण्यासाठी गैरसोयीचे बनले आहे. या बसस्थानकाची दुरवस्था झाल्याची गेल्या अनेक महिन्यांपासून ओरड आहे. परंतु अद्याप याकडे कोणीही लक्ष घातले नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या परिसरातून शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार्या शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी पडक्या बसस्थाकाबाहेर उभे राहावे लागत आहे. तरी या बसस्थानकाची नव्याने उभारणी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ओळी : शेळगाव येथील बसस्थानकाची पडलेली इमारत. (छायाचित्र : राजाराम राऊत)२९०८२०१५-बारामती-०९०००००