शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना घातपाती कारवायांसाठी आयती संधी?; सीमेवरील जवान त्रस्त, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 09:48 IST

सीमेवरील शेतांमध्ये अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तींनी झोपड्या उभारल्या आहेत. शेतकरी या लोकांना शेतीच्या कामांसाठी सीमेवर घेऊन जात आहेत.

सुरेश एस. डुग्गर

जम्मू - जम्मूनजीकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात अनोळखी लोकांची वाढलेली ये-जा, त्यांनी या भागात मांडलेले बस्तान यामुळे तिथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवान त्रस्त झाले आहेत. हे लोक नेमके कुठून आले आहेत, याची माहिती लवकरात लवकर गोळा करावी, असे बीएसएफने स्थानिक प्रशासनाला कळविले आहे. या अनोळखी लोकांच्या आडून दहशतवादी विघातक कृत्ये करण्याची भीतीही बीएसएफने व्यक्त केली आहे.

सीमेवरील शेतांमध्ये अन्य राज्यांतून आलेल्या व्यक्तींनी झोपड्या उभारल्या आहेत. शेतकरी या लोकांना शेतीच्या कामांसाठी सीमेवर  घेऊन जात आहेत. हे अनोळखी लोकांमध्ये काही जण संशयस्पद हालचाली करताना आढळून आले आहेत. 

रात्री जमावबंदीसांबा क्षेत्रामध्ये सीमेवर उभारलेल्या तारेच्या कुंपणापासून एक किमीच्या परिसरात रात्री जमावबंदीचा आदेश याआधीच लागू करण्यात आला आहे. तशी मागणी बीएसएफने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. 

...तर अटक कराजम्मूच्या सीमाभागात भाड्याच्या घरात राहणारे तसेच ज्यांनी झोपड्या बांधल्या आहेत, अशा सर्वांची माहिती पोलिस गोळा करत आहेत. ही माहिती न देणाऱ्या रहिवाशांना अटक करण्याचे आदेश सांबाच्या जिल्हाधिकारी अनुराधा गुप्ता यांनी दिले आहेत. 

खेळण्यातील बंदुकांनी त्रास वाढविला...काश्मीरमध्ये नकली दहशतवाद्यांनी खेळण्यातील बंदुकांचा धाक दाखवून नागरिक, पर्यटकांना लुटण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका नकली दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली होती. पुलवामा जिल्ह्यातील त्रिचला गावामध्ये तीन जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पाच जणांना पकडले व त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाइल हिसकावून घेतले. या तीन जणांनी पोलिस कर्मचारी असल्याचे भासविले, तसेच पकडलेल्या लोकांकडून ओळखपत्रे मागितली होती. मात्र, नंतर या तोतया पोलिसांना पकडण्यात आले. बनावट एके-४७ रायफल व हातबॉम्ब जप्त करण्यात येत आहेत.