शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 20:14 IST

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांवर गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला असून, यामध्ये लष्कराचे काही जवान जखमी झाले असल्याचे कळते. दरम्यान, स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी असलेली वाहने हवाई तळाच्या आत शाहसीतारजवळील भागात सुरक्षित करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुंछमध्ये दहशतवाद्यांचे पुन्हा एकदा भ्याड कृत्य समोर आले. सुरणकोट गावात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या दोन वाहनांवर गोळीबार केला. या घटनेत हवाई दलाचे ५ जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जखमी जवानांना पुढील उपचारासाठी उधमपूर येथील इस्पितळात हलवण्यात आले आहे. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादी