शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 07:40 IST

लेह आणि लडाख भागात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.५ इतकी होती.

लेह, लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे ४:३३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर होता आणि ३४.७३ अक्षांश आणि ७७.०७ रेखांशावर हादरे बसले. जम्मू आणि काश्मीरच्या जवळच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. एनसीएसनुसार, किश्तवाडमध्ये सकाळी १.१० वाजता भूकंप ५ किमी खोलीवर झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

“ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने अन् जवळचे नाते, एक गोष्ट नक्कीच सांगेन की...”: PM मोदी 

पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा ५० किलोमीटर जाडीचा थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे, याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग ७ टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत राहतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा ते एकमेकांवर आदळतात. अनेक वेळा या प्लेट्सही फुटतात. त्यांच्या टक्करमुळे, मोठ्या प्रमाणात ऊर्जा सोडली जाते ज्यामुळे परिसरात हालचाल होते. अनेक वेळा हे धक्के अत्यंत कमी तीव्रतेचे असतात, त्यामुळे ते जाणवतही नाहीत. 

भूकंप पासून कसे वाचायचे? भूकंपाचे धक्के जाणवल्यावर घाबरून जाण्याऐवजी सावधगिरी बाळगा आणि संयम बाळगा. भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर सर्वप्रथम घरातून बाहेर पडून मोकळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. रस्ता अतिशय अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला बहुमजली इमारती असतील तर बाहेर जाण्याचा काही फायदा होणार नाही. त्यानंतर घरात सुरक्षित ठिकाणी राहा. घराबाहेर पडायला बराच वेळ लागल्यास खोलीच्या कोपऱ्यात किंवा एखाद्या भक्कम फर्निचरखाली लपा. 

टॅग्स :EarthquakeभूकंपJammu Kashmirजम्मू-काश्मीर