शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

‘अमूल’ला युरोप बंदी; केंद्र सरकार मात्र थंड

By admin | Updated: March 10, 2016 04:00 IST

युरोपीय युनियनसोबत मुक्त व्यापार समझोत्याबद्दल (फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट) चर्चा सुरू असतानाही ‘अमूल’ला युरोपीय देशांमध्ये आपले उत्पादन विकण्याची अद्याप परवानगी मिळालेली नाही

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीयुरोपीय युनियनसोबत मुक्त व्यापार समझोत्याबद्दल (फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट) चर्चा सुरू असतानाही ‘अमूल’ला युरोपीय देशांमध्ये आपले उत्पादन विकण्याची अद्याप परवानगी मिळालेली नाही. राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात निर्माण होणारे अडथळे दूर करण्यात आले आहेत काय, हे जाणण्याचा प्रयत्न दर्डा यांनी यावेळी केला.दर्डा यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने थातूरमातूर उत्तर दिले, ज्यामुळे केवळ दर्डाच नव्हे तर अवघे सभागृह असमाधानी असल्याचे दिसून आले. दरम्यान विजय दर्डा यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्र्यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली व यावर योग्य उत्तर देण्याची मागणी केली. अमूल हे मुख्यत्वे गुजरात को-आॅपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे ब्रँड आहे, ज्याने आपल्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे तर विदेशातही आपला जम बसविला आहे. असे असतानाही राज्यसभेत या मुद्यावरील केंद्रची भूमिका मात्र थातूरमातूरच दिसत आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन ह्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. युरोपीय युनियनसोबत मुक्त व्यापार समझोता करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विजय दर्डा यांनी पूरक प्रश्न विचारून, युरोपीय युनियनसोबत मुक्त व्यापार समझोताच्या मार्गातील समस्येवर तोडगा निघाला काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने अमूल व अन्य दुग्ध उत्पादनांबाबत निर्माण झालेला पेच सुटला काय? जो समझोता झालेला आहे, त्याचे स्वरूप नेमके कसे आहे? फार्मास्युटिकल आणि आॅटोमोबाईल आदी क्षेत्रांमध्ये युरोपीय युनियनसोबत मुक्त व्यापार समझोता करण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या किती फेऱ्या झाल्या? त्यात निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत काय, असे प्रश्न विजय दर्डा यांनी विचारले.दर्डा म्हणाले, ‘कडक नियम व मापदंड असतानाही अमूल अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये आपली उत्पादने यशस्वीरीत्या विकत आहे. परंतु युरोपीय युनियन मुद्दामून अमूलला व्यापार करण्यापासून रोखत आहे. युरोपीय युनियनची उत्पादने आमच्या देशात विकण्यात येऊ नयेत यासाठी सरकारने कोणती कारवाई केली? आमच्या डेअरी, फार्मा आणि आॅटोमोबाईल उद्योगांच्या हितांचे रक्षण करण्यात आले पाहिजे.