शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 12:07 IST

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत.

अल्पसंख्याक समाज आणि यातही मुस्लीम समाजाच्या दृष्टीने देशात चालणारे राजकारण काही नवीन नाही. अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष त्यांना सहनुभूती दाखवत असतात. मात्र, अशा सर्व पक्षांमध्ये खरा सहानुभूतीदार कोण? यासंदर्भात बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, सर्वच पक्षांनी अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडल्याचे म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार असदुद्दी ओवेसी यांना टीवी 9 भारतवर्षच्या एका कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला होता की, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि मायावती यांपैकी अल्पसंख्यकांचा सहानुभूतीदार कोण? यावर ते म्हणाले, सर्वांनीच अल्पसंख्याक समाजाचे मोठे नुकसान केले आहे. कुणी घाबरवून, कुणी हासून, कुणी कवाली म्हणून तर कुणी गोल टोपी घालून आम्हाला लॉलीपॉप दिले. अखिलेश यादव यांना मुस्लिमांची सर्वाधिक मते - ओवैसीअखिलेश यादव यांच्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, उत्तर प्रदेशच्या इतिसाहात मुस्लिमांची जेवढी मते त्यांना मिळाली (2022 मध्ये) तेवढी कुणालाही मिळाली नाहीत. तरीही भाजपला हरवू शकले नाही. आता त्यांच्याच एका आमदाराचा पेट्रोलपंप तोडला जातो, तरी बोलू शकत नाहीत. 

राहुल गांधींवर निशाणा -राहुल गांधींवर निशाणा साधत ओवेसींनी प्रश्न केले की, राहुल गांधी यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री जी.बी.पंत यांच्याच काळात बाबरी मशिदीचा मुद्दा सुरू झाला नाही? आपले वडील पंतप्रधान असतानाच कुलूप उघडले गेले नाही? जेव्हा मशीद पाडली गेली, तेव्हा आपल्याच पक्षाचे पंतप्रधान होते? यांच्याच सरकारच्या  काळात 1986 मध्ये 350 मुस्लीमांना गोळ्या घातल्या गेल्या.

ममतांच्या बंगालमध्ये मुस्लिमांची स्थिती खराब -ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. मालदा, मुर्शिदाबादच्या भूजलामध्ये आर्सेनिकचे प्रमाण WHO च्या निर्धारित मानकापेक्षा अधिक आहे.

मायावतींबद्दल काय म्हणाले? -मायावतींसंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, ते या तिघांपेक्षा त्यांचा अधिक आदर करतात. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी SC-ST समाजाला एक ओळख आणि राजकीय ताकद दिली. मात्र त्यांनी काही बाबतीत स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे दुःख आहे. म्हणूनच आज त्या कमकुवत दिसत आहेत. त्या ज्या दिवशी स्पष्ट भूमिका घेईल, त्याना उत्तर प्रदेशात फायदा होईल.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीMuslimमुस्लीम