चेन्नई : तामिळनाडू सरकारने आणखी एक लोककल्याणकारी योजना ‘अम्मा सिमेंट’चा आज शुभारंभ केला. या योजनेत, राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात सिमेंट विक्री केली जाणार आहे.सप्टेंबरमध्ये अण्णाद्रमुकच्या सुप्रीमो व तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी या योजनेची घोषणा केली होती. तामिळनाडू सरकार खासगी क्षेत्रातून दोन लाख टन सिमेंट खरेदी करून १९० रुपये प्रति पोते या दराने सर्वच नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना विक्री करणार आहे. अण्णाद्रमुक पार्टीचे कार्यकर्ते जयललिता यांना ‘अम्मा’ म्हणून संबोधतात. अम्मा सिमेंट योजनेचा शुभारंभ आज तिरुचिरापल्ली येथील पाच गोदामांत करण्यात आला. १० जानेवारीपर्यंत संपूर्ण तामिळनाडूत ४७० गोदामांमध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना लागू केली जाणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थी १०० वर्गफूट जागेसाठी किमान ५० पोते सिमेंट आणि १५०० वर्गफूट जागेत बांधकामासाठी अधिकाधिक ७५० पोते सिमेंट खरेदी करू शकतात.
तामिळनाडूत अम्मांची अनोखी सिमेंट योजना
By admin | Updated: January 6, 2015 01:51 IST