शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

अम्मांचा आज फैसला

By admin | Updated: May 10, 2015 23:53 IST

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे.

बंगळुरू : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्यासाठी उद्या सोमवारचा दिवस मोठा असणार आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेला चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटींच्या दंडांच्या शिक्षेविरुद्ध जयललितांनी दाखल केलेल्या अपिलावर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी निर्णय सुनावणार आहे.न्यायालयाच्या सोमवारच्या निकालाचे तामिळनाडूच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात उण्यापुऱ्या वर्षभरानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.कायद्याच्या जाणकारांच्या मते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. आर. कुमारस्वामी यांचे एकलपीठ निर्णय देईल, त्यावेळी ६७ वर्षीय जयललितांना यावेळी न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. जयललिता यांनी १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावर येण्यापूर्वी तीन कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. आपल्या सत्ताकाळात त्यांनी दर महिन्याला केवळ १ रुपया मानधन घेतले होते. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ६६.६५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले होते. १८ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांच्याविरुद्ध याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.निकालादिवशी प्रचंड संख्येने अण्णाद्रमुकचे समर्थक बंगळूरू येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या एक किलोमीटर परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू केली आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे. चेन्नईत अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मंदिरांत पुजाअर्चा केली. जयललिता यांच्या बाजूने निकाल लागावा म्हणून प्रार्थना करण्यात आल्या. तामिळनाडूच्या अन्य भागांतही पक्ष कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)... तर दहा वर्षे निवडणूक बंदीगतवर्षी २७ सप्टेंबरला विशेष न्यायालयाने बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललितांना चार वर्षांचा कारावास व १०० कोटींचा दंड ठोठावला होता. या शिक्षेला जयललिता व अन्य तिघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुटका झाल्यास तो जयललितांचा मोठा राजकीय पुनर्प्रवेश ठरेल. याउलट प्रतिकूल निकाल त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकीर्दीला सुरुंग लावणारा ठरेल. प्रतिकूल निकाल आल्यास लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत १० वर्षे निवडणूक लढण्यास त्यांना बंदी असेल. वरिष्ठ न्यायालयाने शिक्षा रद्द न केल्याच्या स्थितीत दोषसिद्धीच्या तारखेपासून चार वर्षे आणि त्यानंतर सहा वर्षांपर्यंत त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत.