शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा, चिंतेचे कारण नसल्याचे झाले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:55 IST

हिंदी चित्रपटसृष्टीचे बिग बी अमिताभ बच्चन (७५) जोधपूरमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इथे आले असताना, अचानक त्यांची प्रकृती बिघडली.

जोधपूर : हिंदी चित्रपटसृष्टीचे बिग बी अमिताभ बच्चन (७५) जोधपूरमध्ये ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इथे आले असताना, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ते कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठाच धक्का बसला आणि त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याची चर्चा सर्वत्र सुरूझाली. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे कळताच, डॉक्टरांचेपथक चार्टर्ड प्लेनने मुंबईहून येथे आले आणि त्यांना तपासले. डॉक्टरांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्यांची प्रकृती आता बरी आहे, असे टिष्ट्वट त्यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांनीच दुपारी केले.या चित्रपटासाठी त्यांना जो पेहराव करावा लागला, तो वजनाने जड आहे. बहुधा त्याचाच त्यांना त्रास झाला असावा. जया बच्चन यांनीही ती शक्यता व्यक्त केली. अमिताभ यांच्या पाठीत व कमरेत वेदना होत होत्या. पेहरावामुळे अधिक त्रास झाला असावा. औषधोपचारानंतर त्यांना बरे वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.स्वत: अमिताभ बच्चन यांनीच मंगळवारी पहाटे ५ वाजता आपल्या ब्लॉगवर प्रकृतीबाबत भाष्य केले होते. आपल्या डॉक्टरांच्या टीमला इथे बोलविण्यात आले आहे. ते माझ्या प्रकृतीत सुधारणा करतील, असे अमिताभ यांनी ब्लॉगवर सांगितल्यानंतर, सकाळपासूनच याबाबत चर्चेला सुरुवात झाली. अमिताभ यांना ताबडतोब मुंबईत आणावे लागल्यास, त्यासाठी विशेष विमानाचीही व्यवस्था करण्यात आली होती. अमिताभ यांना अनेक वर्षे पोटाचा त्रास होत आहे. कुली चित्रपटाच्या वेळी बंगळुरूमध्ये त्यांना अपघात झाला होता, तेव्हापासून त्यांना हा त्रास होत आहे.अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, तिथे एकच गर्दी केली होती.विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाखाली ‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात आमीर खानही मुख्य भूमिकेत आहे. त्याचे जोधपूरमध्ये चित्रीकरण सुरू आहे.‘ठग्स आॅफ हिंदुस्थान’ या चित्रपटाबाबत काही माहिती देऊन अमिताभ यांनी म्हटले आहे की, काही लोकांना जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. येथे संघर्ष आणि निराशा आणि वेदना आहेत... सहजासहजी काही मिळत नाही. या संघर्षातूनच आमच्या अपेक्षा पूर्ण होतील.>चाहत्यांनी केली प्रार्थनाअमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी दिली आहे. दक्षिणी चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांनीही वृत्त कळताच, चिंता व्यक्त केली होती. रजनीकांत सध्या हिमालयात आहेत. तेथून त्यांनी टिष्ट्वट करून चिंता व्यक्त केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनीही अमिताभ यांच्या प्रकृतीविषयी चौकशी सुरू केली. त्यांना लवकरात लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना अनेक चाहत्यांनी केली.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चन