शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानानंतर शाहांनी गिरिराज सिंहांना फटकारलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:17 IST

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गिरिराज सिंह यांना नितीशकुमारांसंदर्भात केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. अमित शाहांनी फोन करून गिरिराज सिंह यांना तंबी दिली आहे. तसेच अशा प्रकारची तक्रार पुन्हा येता कामा नये, असंही बजावलं आहे. गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी इफ्तार पार्टीत घेतलेल्या सहभागावर ट्विट करत टिपण्णी केली होती. गिरिराज सिंहांच्या त्या ट्विटनंतर बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूमधलं वातावरण गढूळ झालं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांबरोबर वादविवाद होऊ लागले. या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही भाष्य केलं आहे.ते म्हणाले, काही लोकांना कायम चर्चेत राहण्याची आवड असते, त्यामुळे ते असं काही तर बरळतात. दुसरीकडे गिरिराज सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो ट्विटवर शेअर केले होते. ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपा नेते सुशील मोदी, जीतनराम मांझी, रामविलास पासवान आणि त्यांचा मुलगा चिराग पासवान हे एकत्र इफ्तार पार्टीत दिसत होते. गिरिराज सिंह यांनी ते फोटो ट्विट करत नितीश कुमारांना टार्गेट केलं आहे. ते म्हणाले, नवरात्रीतही असं चित्र पाहायला मिळालं असतं तर ते किती सुंदर दिसलं असतं. आपल्या कर्म-धर्माकडे आपण पाठ का फिरवतो. दिखावा करण्यासाठी सगळं करत असतो. बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातून गिरिराज सिंह निवडून आले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं असून, त्यांच्याकडे पशुपालन, डेअरी आणि मत्स्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपा 40 पैकी 17-17 जागांवर लढली होती. तर सहा जागा लोकजनशक्ती पार्टीला सोडण्यात आल्या होत्या.तर दुसरीकडे इफ्तारविषयी राष्ट्रीय जनता दलाचे नेते रघुवंश प्रसाद सिंह म्हणाले की, आम्हाला नितीश कुमार यांचे वावडे (अ‍ॅलर्जी ) नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. तुमचे हे म्हणजे लालूप्रसाद यादव यांना मान्य होईल का, या प्रश्नावर सिंह म्हणाले की, मी आता माझे म्हणणे उघडपणे व्यक्त केले आहे. मी आणि लालुप्रसाद यांनी अनेक वर्षे एकत्र कामही केले आहे. नितीश कुमार यांच्याविषयी मांझी म्हणाले की, त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्याने माझे व त्यांचे बिनसले होते. पण त्याला चार वर्षे झाली. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझे नितीश यांच्याशी कायमचे भांडण नाही.वेगळे होण्याची तयारी?केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाला एकच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाने मोदी मंत्रिमंडळात न जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर नंतर स्वत:च्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपला विश्वासातही घेतले नाही. आता राज्यात स्वत:चा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने नितीश कुमार यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते भाजपपासून दूर जाण्याची चर्चा सुरू आहे.