शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटात केंद्राचे राज्य सरकारांना कडक निर्देश; २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंधांमध्ये वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 20:16 IST

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली-

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांनी आज पुन्हा एकदा राज्यांच्या सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं डिसेंबर महिन्यात ज्या गाइडलाइन्स जारी केल्या होत्या त्या आता २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचं गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संबंधी नियमांचं प्रत्येक राज्यांना पालन करायला हवं असं गृह सचिवांनी नमूद केलं आहे. 

देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण २२ लाखांवर पोहोचले आहेत. असं असलं तरी रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण वाढती रुग्णसंख्या पाहता गाफील राहून चालणार नाही. देशातील एकूण ३४ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील एकूण ४०७ जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अधिक सावधनता बाळगण्याची गरज असल्याचं देखील भल्ला म्हणाले. 

पाचस्तरीय रणनितीवर काम करण्याची गरज कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आपल्याला पाच स्तरीय रणनितीवर काम करण्याची गरज असल्याचं अजय कुमार भल्ला म्हणाले. ते म्हणाले की, "टेस्ट, ट्रॅक, लसीकरण आणि कोरोना गाइडलाइनचं पालन याच गोष्टी आपल्याला कोरोना महामारी विरोधातील युद्ध जिंकण्यासाठी मदत करतील. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची आवश्यक असून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे"

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या