शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 04:41 IST

घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन - घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे.अमेरिकेच्या श्रम विभागाच्या वतीने शनिवारी वार्षिक ‘बालमजुरी आणि बेठबिगारी अहवाल’ जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, यंदा अत्यंत कठोर निकष लावून जगातील १३२ देशांच्या बालमजुरी निवारणाच्या प्रयत्नांचा अभ्यास करण्यात आला आहे. या निकषांचे पालन केवळ १४ देशांनीच केल्याचे दिसून आले आहे. कोलंबिया, पॅराग्वे आणि भारत यांचा त्यात समावेश आहे. ठराविक कायदेशीर आणि धोरणात्मक निकषांचा त्यात समावेश होता. अहवालानुसार घातक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यावर बंदी घालण्यासाठी भारत सरकारने आपल्या बालमजुरी कायद्यात सुधारणा केली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या १८२ व १३८ परिषदेने संमत केलेल्या ठरावानुसार, भारताने हे बदल केले आहेत. याशिवाय बालमजुरी रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्याची तसेच राष्ट्रीय बालमजुरी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने एक प्लॅटफॉर्म तयार केला.बालमजुरी संपलेली नाहीअहवाल म्हणतो की, सरकारने चांगले प्रयत्न केले असले तरी भारतातील बालमजुरी अजून संपलेली नाही. घातक स्वरूपाच्या व्यवसायात अजूनही मुलांना कामाला जुंपले जाते. बालकांना बेठबिगार म्हणूनही राबवून घेतले जाते.

टॅग्स :newsबातम्या