शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयानं सांगितलं उपचारासाठी फक्त 1 लाख रुपये लागतील, हातात दिलं तब्बल 2.3 कोटींचं बिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 17:57 IST

अमेरिकेत उघडकीस आलेल्या या घटनेतील महिलेला तब्बल 2 कोटी रुपयांहूनही अधिकचे बिल पाठवण्यात आले होते.

एका रुग्णालयाने आपल्या महिला रुग्णाला तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांहूनही अधिकचे (3,03,709 अमेरिकन डॉलर) बील दिल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत समोर आली आहे. खरे तर, या महिलेला आपल्या सर्जरीसाठी केवळ 1 लाख रुपये, म्हणजेच 1300 अमेरिकन डॉलरच द्यायचे होते. यासंदर्भात, तेथील सर्वोच्च न्यायालयानेही आता या महिलेच्या बाजूने निर्णय दिला आहे. खरे तर, या रुग्णालयाने सबंधित महिलेच्या बिलात काही असे चार्ज लावले, ज्यांबद्दल महिलेला आधी कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती.

अमेरिकेत उघडकीस आलेल्या या घटनेतील महिलेला तब्बल 2 कोटी रुपयांहूनही अधिकचे बिल पाठवण्यात आले होते. याप्रकरणी कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. या महिलेने सबअर्बन डेनव्हेर हॉस्पिटलमध्ये स्‍पायनल फ्यूजन सर्जरी केली होती. लिजा फ्रेंच असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी 2014 मध्ये स्वतःच्या दोन सर्जरी करवल्या होत्या.

सीबीसीच्या वृत्तानुसार, वेस्‍टमिंस्‍टरमधील 'सेंट एंथनी नॉर्थ हेल्‍थ कॅम्पस' फ्रेंच यांना एक्‍सट्रा चार्ज देण्यासाठी बळजबरी करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. बिलाच्या नावावर नेमके काय झाले? फ्रेंच यांना आपल्या उपचारासाठी साधारणपणे 1 लाख रुपये द्यायचे होते. पण, त्यांचे बील 2 कोटी 35 लाख रुपयांहूनही अधिक झाले होते. तर, इंश्‍योरन्स कंपनीने त्यांना केवळ 57 लाख रुपयेच (74,000 अमेरिकन डॉलर) दिले होते. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAmericaअमेरिकाCourtन्यायालय