आंबेडकर जयंती मिरवणूक बंदोबस्त...जोड
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
भिंगारला सहा मंडळे
आंबेडकर जयंती मिरवणूक बंदोबस्त...जोड
भिंगारला सहा मंडळेभिंगार शहरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्यावर भिंगार शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येथे दोनशे ते तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भिंगार येथील दलित वस्ती, भिंगार वेस आदी संवेदनशील भागात पोलिसांची नजर राहणार आहे. मिरवणुकीमुळे महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे. भिंगार वेस भागातील वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे. भिंगार शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर सहा मंडळांनी सहभाग घेतला आहे.--------सहा वाजता मिरवणुका सुरूशहरातील मुख्य मिरवणुका सायंकाळी सहा वाजता मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहेत. या मिरवणुका सहा वाजण्याच्या आधीच सुरू व्हाव्यात, असा प्रयत्न पोलिसांतर्फे सुरू आहे. दरम्यान, रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही मंडळाला डीजेची परवानगी दिलेली नाही. मात्र, ध्वनिपातळीचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.------------