शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींनी पुन्हा लिहिलं राहुल गांधींना पत्र, राफेल करारातील सर्व आरोपांचं केलं खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 10:54 IST

राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली- राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राफेल करारावरून राहुल गांधी मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच या राफेल कराराच्या माध्यमातून अनिल अंबानींना मोदींनी फायदा पोहोचवून दिल्याच्याही राहुल गांधींनी आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधींना दुसरं पत्र लिहिलं आहे.पत्रात ते लिहितात, काही खासगी स्वार्थासाठी आणि व्यावसायिक प्रतिस्पर्धेसाठी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच पहिल्या पत्रातही अनिल अंबानींनी राहुल गांधींच्या एका एका मुद्द्याचं निरसन करत खंडन केलं होतं. तसेच काँग्रेस रिलायन्स समूहावर करत असलेल्या आरोपांमुळे अतीव दुःख होत असल्याची भावनाही अनिल अंबानींनी व्यक्त केली आहे.तत्पूर्वी 12 डिसेंबर 2017 रोजी अनिल अंबानींनी राहुल गांधींना पहिली पत्र लिहिलं होतं. आमच्याकडे संरक्षण जहाज बनवण्याचा अनुभव असल्यानेच रिलायन्स समूहाला हा करार प्राप्त झाला आहे. दुस-या पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले आहेत. राफेल ही लढाऊ विमानं रिलायन्स आणि दसॉ संयुक्तरीत्या तयार करणार नाहीत.सर्व 36 विमानांचं 10 टक्के निर्माण हे फ्रान्समध्ये होणार आहे. त्यानंतर फ्रान्स ती विमानं भारताला निर्यात करणार आहे. एडीएजी समूहाकडे विमान बनवण्याचं कौशल्य नसताता त्यांना 45 हजार कोटींचा फायदा पोहोचवण्यात आला, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना अनिल अंबानी म्हणाले, 36 राफेल विमानांचं एकही पार्ट भारतात रिलायन्स समूहाद्वारे बनवला जाणार नाही. ती सर्व विमानं फ्रान्समध्ये तयार होणार आहेत. आम्ही फक्त निर्यातीमध्ये सहभागी राहणार आहोत, असंही अंबानींनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानी