शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

भारीच! 'ती' हनुमान चालिसा म्हणत होती अन् डॉक्टरांनी केलं 'मेंदूचं ऑपरेशन'; Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 08:54 IST

Aiims doctor doing brain surgery patient reading hanuman chalisa : एम्स रुग्णालयातील डॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा म्हणत होती.

नवी दिल्ली - दिल्लीतील एम्सच्या न्यूरो एनेस्थेटिक टीमला  (Neuro Anaesthetic) एक मोठं यश मिळालं आहे. डॉक्टरांच्या टीमने एका 24 वर्षीय तरुणीला पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे. ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एम्स रुग्णालयातीलडॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणत होती. सर्वत्र डॉक्टरांच्या टीमचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बिकानेरमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. एका व्यक्तीची ब्रेन ट्यूमरची सर्जरी करायची होती. मात्र ही व्य़क्ती सर्जरी करायला खूप जास्त घाबरत होती. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना बेशुद्ध न करता सर्जरी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी खूप समजावून सांगितल्यानंतर रुग्ण हे करण्यास तयार झाला. शारीरीक त्रास जाणवू नये यासाठी काही प्रयत्न करण्यात आलं. याच दरम्यान हा रुग्ण देखील हनुमान चालिसाचा जप करत होता. त्याचं ऑपरेशन देखील यशस्वी झालं आहे. 

मेंदूचं ऑपरेशन होत असताना रुग्ण हनुमान चालिसा वाचत असल्याचा मोठा फायदा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मेंदुतील आवाजावर नियंत्रण ठेवणारा भाग त्यामुळे संतुलित राहतो आणि रुग्ण एका सलग आवाजात बोलत राहिल्याने हा भाग जागृत राहतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. काही तासांच्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मेंदूतील गाठ यशस्वीपणे बाहेर काढण्यात यश मिळवलं. डॉक्टरांच्या या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असलं की नातेवाईक देवाचा धावा करतात. पण इथे रुग्णचं हनुमान चालिसा वाचत असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करायची होती. मात्र ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला झोपायची परवानगी नव्हती अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाला त्याचा आवडता टीव्ही शो 'बिग बॉस' आणि हॉलिवूड चित्रपट 'अवतार' दाखवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण या गोष्टी लॅपटॉपवर पाहत असेपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ओपन ब्रेन शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या मेंदूत डाव्या बाजूला असलेल्या प्रीमोटर क्षेत्रातील ग्लिओमा काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया संपेपर्यंत लॅपटॉपवर बिग बॉस आणि अवतार सिनेमा दाखवला होता.

 

टॅग्स :delhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टर