शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण

By admin | Updated: July 11, 2017 13:48 IST

बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 11- सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार केला गेला. या हल्ल्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.
 
"गोळीबार सुरू असताना बस चालवणं सुरू ठेवण्याची हिंमत मला देवानेच दिली. म्हणूनच मी थांबलो नाही. गोळीबार सुरूच होता म्हणूनच मी थांबलो नाही", असं बस चालक सलीमने सांगितलं आहे. 
 
"रात्री 9 वाजता आम्हाला सलीमने फोन करून गोळीबाराची माहिती दिली होती. गोळीबारात सात जणांना सलीम वाचवू शकले नाहीत पण पन्नासपेक्षा जास्त यात्रेकरूंना त्यांनी सुरक्षीत ठिकाणी पोहचवलं, याचा आम्हाला गर्व आहे, अशी प्रतिक्रिया सलीमचे नातेवाईक जावेद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. 
 
संबंधित बातम्या
 
अमरनाथ दहशतवादी हल्ला - जखमींना एअरलिफ्ट करुन आणणार दिल्लीत
प्रत्येक काश्मिरीची मान शरमेने खाली गेली आहे - मेहबूबा मुफ्ती
अमरनाथ हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश
 
 
अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यामागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलीस महनिरीक्षक मुनीर खान यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
 
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
 
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला. 
 
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रापूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.