शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

अमरनाथ दहशतवादी हल्ला - जखमींना एअरलिफ्ट करुन आणणार दिल्लीत

By admin | Updated: July 11, 2017 08:19 IST

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या 32 यात्रेकरुंना एअरलिफ्ट करुन दिल्लीला आणण्यात येणार आहे. याशिवाय अमरनाथ यात्रेच्या  वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसून आधीप्रमाणे सुरु राहणार आहे. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. जखमींना एअरलिफ्ट केलं जाईल असं निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे. 
 
संबंधित बातम्या
अमरनाथ यात्रेवर हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध
अमरनाथ हल्ला: पहिली घोडचूक, भाविकांच्या बसचं रजिस्ट्रेशन नव्हतं
 
 
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह बोलले आहेत की, "जखमींना रात्रीच श्रीनगरला शिफ्ट करण्यात आलं आहे. यानंतर सकाळी बीएसएफच्या विशेष विमानाने त्यांना दिल्लीला पाठवण्यात येईल. जखमींसोबत मृतदेहही पाठवण्यात येणार आहेत". 2000 नंतर अमरनाथ यात्रेवर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी गुजरातहून आलेल्या एका बसवर निशाणा साधला, ज्यामध्ये बसमधील सहा महिलांसहित सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना धोका नसल्याची माहिती निर्मल सिंह यांनी मेहबुबा मुफ्तींना दिली आहे. विभागीय आयुक्त मनदीप भंडारी यांनी सांगितलं आहे की, "यात्रेत कोणतीही अडचण येणार नाही. ठरल्याप्रमाणे मंगळवारी यात्रा सुरु राहणार आहे". 
 
मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचं म्हटलं आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचं सांगितलं आहे. "इतक्या अडचणी असतानाही यात्रेकरु दरवर्षी काश्मीरमध्ये येतात. आज सात लोकांचा मृत्यू झाला आहे. माझ्याकडे याचा निषेध करण्याशिवाय दुसरं काही नाही. सुरक्षा जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस कट रचणा-यांना अटक करुन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे", असं मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. "ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही", असंही त्यांनी सांगितलं आहे. 
 
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद 
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्याच्या एसपी कंट्रोल रुमकडून सूचना देण्यात आल्यानंतर जम्मूमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.