शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

अमरिंदर सिंग यांचा १६ मार्च रोजी शपथविधी

By admin | Updated: March 13, 2017 04:20 IST

पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हे १६ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाचे काही सदस्यही त्याच दिवशी

चंदीगड : पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हे १६ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. अमरिंदरसिंग यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाचे काही सदस्यही त्याच दिवशी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. अमरिंदरसिंग यांनी रविवारी राजभवन येथे राज्यपाल व्ही. पी. सिंग बदनोर यांची भेट घेऊन राज्य सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. त्यानंतर अमरिंदरसिंग हे दिल्लीला रवाना झाले.कॅप्टन अमरिंदरसिंग हे आपल्या मंत्रिमंडळातील संभाव्य सदस्यांची यादी घेऊन दिल्लीला गेल्याचे समजते. तेथे काँग्रेसश्रेष्ठी या यादीवर शिष्कामोर्तब करतील. या यादीत नवज्योतसिंग सिद्धू आणि मनप्रितसिंग बादल यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे.दरम्यान काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी चंदीगडच्या सेक्टर-१५ येथील पंजाब काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला काँग्रेसच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी उपस्थित होत्या. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री बनतील, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या बैठकीत केवळ औपचारिकता म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांची नेतेपदी निवड करण्यात आली.कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या बळावर काँग्रेसने विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागा जिंकल्या आहेत.तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सादर दिला. राज्यपालांनी बादल यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सल्ला दिला. अकाली दल-भाजपाच्या पराभवाबद्दल बोलताना प्रकाशसिंग बादल म्हणाले, ‘युतीच्या पराभवाची समीक्षा केली जाईल. हा जनादेश आम्ही मान्य करतो.’ या निवडणुकीत अकाली दलाला केवळ १५ तर भाजपाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यपालांनी बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विधानसभा विसर्जित केली. आता नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी नव्या विधानसभेचे अधिवेशन १८ मार्च रोजी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.