शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: चिदंबरम यांनी बेसुमार कर्ज वाटप केल्यानंच अर्थव्यवस्था संकटात; अमर सिंह यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:39 IST

माझ्याकडे सर्व पुरावे, ते सार्वजनिकही करू शकतो; अमर सिंह यांचा चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप

नवी दिल्ली: राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंबानी मोदींचे घनिष्ट मित्र असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात. मात्र अंबानी यांचे घनिष्ट मित्र मोदी नसून पी. चिदंबरम आहेत. चिदंबरम अर्थमंत्रिपदी असतानाच अंबानी यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मिळाली. ती आता बुडित खात्यात गेली आहेत. याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा सिंह यांनी केला. सिंह यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडीओच्या माध्यमातून चिदंबरम यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी हे अंबानींचे मित्र आहेत, असा आरोप वारंवार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. त्यावर भाष्य करताना अमर सिंह यांनी चिदंबरम अर्थमंत्री असताना काही उद्योगपतींना बेसुमार कर्जे वाटण्यात आल्याचं म्हटलं. 'राहुलजी, मी विनंती करून तुमच्याशी बोलत आहे. कदाचित याची तुम्हाला कल्पना नसेल. व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत, रिलायन्सचे अनिल अंबानी यांना तुम्ही मोदींचे मित्र म्हणता. मात्र हे उद्योगपती तुमचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे घनिष्ठ मित्र आहेत. याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही ज्या दिवशी सांगाल, तेव्हा हे पुरावे समोर आणू शकतो,' असं सिंग यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.  बुडित खात्यात गेलेले सरकारी बँकांचे कोट्यवधी रुपये आणि त्यामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चिदंबरमच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सिंह यांनी केला आहे. 'वेणुगोपाल धूत कोणत्या सुविधेचा वापर करुन चिदंबरम यांना तयार करायचे, हे सांगायलादेखील मला लाज वाटते. राहुलजी, तुम्ही काहीच करू नका. फक्त सध्या एनपीए झालेली कर्जे यूपीए-२ सरकारच्या काळात कोणी वाटली, याचा विचार करा. ती कर्जे चिदंबरम यांच्या कार्यकाळात वाटली गेली नसल्यास एक श्वेतपत्रिका काढा,' असं थेट आव्हानच सिंह यांनी दिलं आहे.राहुलजी, तुमचे चिदंबरम सीबीआयला कायद्याचं ज्ञान देत आहेत. मात्र त्यांनी अर्थमंत्री असताना कोट्यवधी रुपये स्वत:ची संपत्ती असल्यासारखे वाटले. जेव्हा ही कर्जे बुडाली, तेव्हा मोदींच्या हाती कारभार आला. त्यामुळे बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेला केवळ एक आणि एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजे पांढरीशुभ्र लुंगी घालणारे चिदंबरम.. चिदंबरम.. चिदंबरम...', असा सनसनाटी आरोप सिंह यांनी केला आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी