शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मुली तरी ६५ % महिला आनंदी, वंशाच्या दिव्यासाठी नाही आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 06:07 IST

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

नवी दिल्ली : पूर्वी वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवाच, असा कुटुंबीयांचा आग्रह असायचा. पण आता परिस्थिती बदलत आहे असे दिसते. दोन मुली असलेल्या महिलांपैकी ६५ टक्के महिलांना आपल्याला मुलगा व्हावा, असे अजिबात वाटत नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

तंबाखू सेवन करणाऱ्यांत घटमद्यपान, तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. २०१५-१६ मध्ये मद्यपान करणारे २९ टक्के व तंबाखू सेवन करणारे ४५ टक्के होते. २०१९-२१ या कालावधीत मद्यपींची संख्या २२ टक्क्यांपर्यंत व तंबाखू सेवन करणाऱ्यांचा आकडा ३९ टक्क्यांपर्यंत घटला. 

९९.५ टक्के महिला सहन करतात अत्याचार लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ९९.५ टक्के महिला घडलेला प्रकार कुणालाही सांगत नाहीत. तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत.ज्यांचे पती मद्यपी आहेत, त्यांच्यापैकी ७० टक्के महिलांना नेहमीच मारहाण होते. २३ टक्के महिलांचे पती मद्यपी नाहीत, तरीही त्यांना मारहाणीला सामोरे जावे लागते.

ज्यांना दोन मुले आहेत अशा महिलांना मुलगी हवी, असे वाटत नाही असे यातून दिसून आले आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ७०% विवाहित महिलांना दोनपेक्षा अधिक मुले नको असतात. २०१५-१६ या कालावधीत हे प्रमाण ६८ टक्के होते, असे आढळले आहे. 

मायेचा पदर!मुलगा असो मुलगी आईचा मायेचा पदर दोघांसाठी सारखाच. ही माऊली आपल्या कडेवर असलेल्या लेकराला आणि शेजारी चालत असलेल्या मुलीला सावली देत स्वत: मात्र उन्हाचे चटके सहन करत चालली आहे. वंशासाठी पोटी दिवा हवाच, अशी पारंपरिक मानसिकता आता मागे पडत चालली आहे. (छाया : संजय लचुरिया)