शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सरन्याधीशांसह आजी, माजी ३० न्यायाधीशांवरही चीनची पाळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 02:16 IST

झेन्हुआ डाटा या कंपनीच्या माध्यमातून चीन पाळत ठेवून आहे.

नवी दिल्ली : चिनी कंपनी पाळत ठेवून असलेल्या भारतातील दहा हजार मान्यवर व्यक्तीत भारताचे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील आणखी एक न्यायाधीश, विद्यमान आणि निवृत्त नियामकांसह ३० न्यायाधीश आहेत. झेन्हुआ डाटा या कंपनीच्या माध्यमातून चीन पाळत ठेवून आहे.झेन्हुआ डाटा या कंपनीने तयार केलेल्या महत्त्वपूर्ण डेटाबेसनुसार सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. संदीप मेहता, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. सुनीता अगरवाल यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या सध्या महत्त्वाच्या पदावर असलेले न्या. पिनाकी चंद्र घोष (चेअरमन, लोकपाल), न्या. शिव कीर्ती सिंह (चेअरमन, टेलिकॉम डिस्पूटस् सेटलमेंट अ‍ॅण्ड अपिलेट ट्रिब्युनल), न्या विक्रमजित सेन (चेअरमन, गव्हर्निंग बोर्ड, मुंबई स्टॉक एक्स्चेंज) आणि न्या. चंद्रमौली कुमार प्रसाद (चेअरमन, प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया) यांचाही चीन पाळत ठेवून असलेल्या व्यक्तींच्या यादीत समावेश आहे.बौद्धिक संपदा अपिलीय मंडळाचे माजी चेअरमन न्या. के. बाशा आणि न्या. एस. उषा (माजी चेअरमन, आयपीएबी), न्या. सतीश अग्निहोत्री (सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश) हेही आहेत. एप्रिल २०१९ मध्ये दंतेवाडात नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या चौकशीसाठी आॅगस्ट २०१९ मध्ये छत्तीसगढ सरकारने स्थापन केलेल्या न्यायालयीन आयोगाचे अग्निहोत्री प्रमुख आहेत.अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी प्रभारी मुख्य न्यायाधीश अमितव लाला हेही उपरोक्त यादीत आहेत. १९८२ मध्ये झालेल्या १७ जणांच्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी प. बंगाल सरकारने मार्च २०१२ मध्ये स्थापन केलेल्या एक सदस्यीय आयोगाचे ते प्रमुख आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय