शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात सर्व वाहने महागणार!

By admin | Updated: December 31, 2014 02:26 IST

नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत.

अबकारी करसवलत मागे : ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी मोजा अधिक पैसेनवी दिल्ली : नवीन वर्षात स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अबकारी करात देण्यात आलेल्या सूट योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याने एक जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल.स्वयंचलित वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्राला यापुढे सरकार अबकारी करात सवलत देणार नाही, असे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल. सध्या सरकारपुढे आर्थिक तूट सकल देशी उत्पादनाच्या ४.१ टक्के करण्याचे लक्ष्य असून, त्या दिशेने हा निर्णय मदत करू शकेल. आर्थिक वाढीचा वेग मंदावल्यामुळे अडचणीत आलेल्या या दोन क्षेत्रांना यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ही सवलत यावर्षी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात दिली होती. ही सवलत कार्स, एसयूव्ही, दुचाकी वाहने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांना मिळत होती. अबकारी कर छोट्या कार्स, स्कूटर्स, मोटारसायकल्स व व्यावसायिक वाहनांना १२ टक्क्यांऐवजी ८ टक्के दिला गेला होता. एसयूव्हीसाठी हा कर ३० टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आला होता. मध्यम आकाराच्या कार्सना २४ वरून २० व मोठ्या कारना २७ वरून २४ टक्के करसवलत दिली गेली होती. ग्राहकोपयोगी उत्पादनांना १२ टक्क्यांवरून १० टक्के अबकारी कर लावण्यात आला होता.जून महिन्यात मोदी सरकारने अबकारी करातील ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. सरकारच्या या निर्णयाची औपचारिक माहिती कंपन्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला उत्पादनांच्या किमती किती वाढवायच्या याचा निर्णय घेता आलेला नाही, असे होंडा कार्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग अँड सेल्स) ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले. सेन म्हणाले, की या निर्णयामुळे किमती वाढतील आणि या निर्णयामुळे काही कालावधीसाठी मागणीवरही परिणाम होईल. अशीच प्रतिक्रिया व्यक्त करताना मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले, की हा सरकारचा निर्णय असून तो स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याचा विक्रीवर परिणाम होईल व काही काळासाठी का होईना विक्री घटेल.सरकारच्या निर्णयामुळे येणारे ओझे ग्राहकांवर ढकलण्याची वेळ आली आहे व विक्रीवरही परिणाम होईल, असे ग्राहकोपयोगी उत्पादकांनी म्हटले. अबकारी करात वाढ झाल्यामुळे सगळ्या उद्योजकांना किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसेल, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अ‍ॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे एरिक ब्रॅगन्झा यांनी सांगितले. 2015 च्या पहिल्या तीन महिन्यांत चांगली विक्री होईल, अशी आमची अपेक्षा होती; परंतु सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचा हिरमोड होईल, असे ते म्हणाले. ब्रॅगन्झा हे हायर इंडियाचे अध्यक्षही आहेत. सलग दोन वर्षे मंदी अनुभवलेल्या वाहन बाजारपेठेला या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान १०.०१ टक्के सूट मिळाली होती.