शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

सर्व शिखांना खलिस्तान हवे -ग्यानी हरप्रीत सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:40 IST

सरकारने दिले, तर आम्ही ते स्वीकारू

अमृतसर : सगळ्या शिखांना खलिस्तान हवे असून ते जर दिले गेले तर ते स्वीकारतील, असे अकाल तख्तचे कार्यकारी जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी शनिवारी येथे म्हटले. येथील सुवर्णमंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ३६ वर्षांपूर्वी सहा जून रोजी लष्कराने कारवाई केली होती.

पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांंनी विचारले की, ‘‘याचा अर्थ तुम्ही खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देत आहात का?’’ त्यावर हरप्रीत सिंग म्हणाले, ‘‘जर सरकारने आम्हाला खलिस्तान दिले तर आम्ही आणखी काय मागणार? आम्ही ते स्वीकारू. प्रत्येक शिखाला खलिस्तान हवे आहे. शीख युवक खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असेल तर त्यात काही चूक नाही.’’ याच पत्रकार परिषदेत शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) अध्यक्ष गोबिंदसिंग लोंगोवाल अशाच प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ‘‘जर कोणीही ते आम्हाला देऊ केले तर आम्ही ते स्वीकारू.’’ शिखांच्या पाच तख्तांमध्ये अकाल तख्त हे सर्वोच्च पीठ आहे. अकाल तख्त आणि एसजीपीसीने एकाच वेळी स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा द्यायची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.हरप्रीत सिंग आणि लोंगोवाल यांच्या वक्तव्यांना शीख फुटीरवादी आणि ‘दल खालसा’चा संस्थापक गजिंदर सिंग याने फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘‘अकाल तख्तच्या नेत्याने आज त्यांच्या पद्धतीने खलिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या वक्तव्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला देवाचे आशीर्वाद लाभावेत.’’पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी जे जबाबदारीच्या पदावर बसले आहेत त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी, असे म्हटले.

टॅग्स :Punjabपंजाब