शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

सर्वच पक्षांचा भर सोशल मीडियावर

By admin | Updated: October 10, 2014 05:29 IST

त्यातल्या चुका दुरुस्त करून वा आवश्यक त्या सुधारणा करून लोकांच्या मनातील पक्षविरोधी प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न ही टीम करते.

मुंबई : सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर तसेच लोकसभेत भाजपाने आॅनलाइन प्रचार मोहीम चालवून मिळविलेले यश या दोन्ही बाबी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोशल मीडियावर जास्त भर दिला आहे. तर दुसरीकडे मात्र, निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना देण्यात आलेली निवडणूक खर्चाची दरसूची केवळ पारंपरिक प्रचार साहित्याचीच असून, त्यात हायटेक प्रचार साहित्याचा समावेशच नसल्याचे चित्र आहे.आघाडी सत्तेवर असताना गेल्या १५ वर्षांत राज्यात झालेली विकासकामे, हा प्रमुख मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर मांडला जात आहे. राष्ट्रवादीच्या दृष्टीने नकारात्मक ट्रेण्ड आहे का, यावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी पक्षाने तज्ज्ञांची टीम नियुक्त केली आहे. त्यातल्या चुका दुरुस्त करून वा आवश्यक त्या सुधारणा करून लोकांच्या मनातील पक्षविरोधी प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न ही टीम करते.प्रतिस्पर्धी पक्षांच्या प्रचाराला तोडीस तोड उत्तर देण्याच्या रणनीतीच्या दृष्टीने सोशल मीडियावर देण्यात येणारा मजकूर तयार करण्याबरोबरच दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिरातींचे वेळापत्रकही राष्ट्रवादीकडून सांभाळले जात आहे. भाजपाने तर २४ तास कार्यरत राहणारी ‘वॉर रूम’च तयार केली आहे. पक्षात एखादी घडामोड घडली तर, ती लागलीच मतदारांपर्यंत पोहोचविली जाते. तसेच दिवसभरातील कार्यक्रम जाणून घेण्यासाठी उमेदवार व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकचा वापर करीत आहेत. आॅटोमेटेड व्हॉइस कॉलिंग फॅसिलिटी आणि मेसेजेसद्वारे भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. काँग्रेसने या वेळी माध्यमांबाबत अतिशय आक्रमक धोरण आखले आहे. राज्यभरात काँग्रेसची ५८ जिल्हा कार्यालये असून, त्या प्रत्येक ठिकाणी फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप यासाठी सोशल मीडियाशी संबंधित तज्ज्ञांचे एक पथक नेमले आहे. तसे टिष्ट्वटर आणि युट्युबवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने काही जिल्ह्यांमध्ये माणसे नेमली आहेत.