शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

गाेव्याच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:00 IST

भाजप, काँग्रेस हे प्रमुख पक्ष असले तरी इतरही पक्षांचा गाेव्याच्या निवडणुकीत बाेलबाला पाहायला मिळताे आहे. अर्धादेश ओलांडून पश्चिम बंगालमधून ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने गाेव्यात एन्ट्री केली.

राजेश निस्ताने, वृत्तसंपादक, नांदेडगोव्याने विविध बाबतीत आपली वेगळी परंपरा जपली आहे. जग कितीही बदलले पण त्यांचे वेगळेपण कायम आहे. निवडणुकीतील प्रचारही ते अशाच वेगळ्या पद्धतीने करतात. उमेदवार व कार्यकर्ते घराेघरी जाणार, तेथे डान्स-गाणे करून मतदारांचे लक्ष वेधणार. अनेकदा मतदारही उत्साहाने त्यात सहभागी हाेतात. सालेगावात काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचारात ‘पाण्याच तळं चूकलाे, सालेगावात केदार जिंकलाे’ या घाेषणांवरील डान्स सर्वत्र व्हायरल झाला. अशाेक चव्हाण ये लाे, केदार नाईक जिंकलो, बंबईसे आया मेरा दाेस्त, यासारख्या घाेषणा देत प्रचार करण्यात आला. सर्वच मतदारसंघात प्रचाराचा हा पॅटर्न झाला आहे. येथे विधानसभेची निवडणूक असली तरी महापालिकेतील वाॅर्डाच्या निवडणुकीचाही माहाेल पाहायला मिळत नाही. परंतु, प्रत्यक्ष मतदान हे ८० टक्क्यांच्या पुढेच राहते. गाेवेकर नागरिकांबाबत अंदाज बांधणे तसे कठीणच. येथील नागरिक निवडणुका, प्रचार यात फारसे सहभागी हाेत नाहीत. त्यामुळे उमेदवारांना ‘डाेअर टू डाेअर’ प्रचार करून मतदारांना घरीच भेटीला जावे लागते.भाजप, काँग्रेस हे प्रमुख पक्ष असले तरी इतरही पक्षांचा गाेव्याच्या निवडणुकीत बाेलबाला पाहायला मिळताे आहे. अर्धादेश ओलांडून पश्चिम बंगालमधून ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने गाेव्यात एन्ट्री केली. परंतु गाेवेकरांसाठी सध्यातरी तृणमूल ‘नया है वह’ एवढाच मर्यादित आहे. दिल्लीतील कामगिरीच्या भरवशावर आम आदमी पक्षाने गाेवा काबीज करण्याचा प्रयत्न चालविला आहे. येथील महिला राजकीय विषयांवर कुठेच व्यक्त हाेताना दिसत नाहीत. ‘आपले काम भले अन् आपण भले’ एवढी मर्यादित दिनचर्या असूनही मतदानासाठी मात्र त्या आवर्जून हजेरी लावतात.

साधेपणा हाच दागिनासाधेपणा हा गाेव्यातील जनतेचा खरा दागिना आहे. राजकारणातदेखील हा फरक पाहायला मिळताे. या राज्यात मुख्यमंत्रीसुद्धा एखाद्या हाॅटेलसमाेर आपली मारुती-८०० कार घेऊन दोन-चार मित्रांशी गप्पा मारताना दिसतात. येथील राजकारणी इतर राज्यातील नेत्यांप्रमाणे कायम सुरक्षा कवचात वावरत नाहीत. सहज कुठेही उपलब्ध हाेतात. साधेपणाची ही संस्कृती काँग्रेस, भाजप व इतरही पक्षात पाहायला मिळते. भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असला तरी गाेव्यात एका मर्यादेपर्यंतच त्यांनी हिंदुत्वावर जाेर दिला आहे. त्यामुळेच की काय भाजपने ४० पैकी १० ते १२ ख्रिश्चन नागरिकांना पक्षाची उमेदवारी दिली आहे. बाहेर भाजप ‘बिफ’च्या मुद्द्यावर खूप माेठा आवाज उठविते, आंदोलन करते. गाेव्यात मात्र त्यावर बाेलतानाही दिसत नाही. हाच येथील राजकारणातील मूळ फरक आहे.

‘या’ लढतींकडे राहणार लक्षमाजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पणजी या परंपरागत मतदारसंघातील लढत देशभरातच लक्षवेधी ठरली आहे. कारण भाजपने तिकीट नाकारल्याने पर्रीकरांचे पुत्र उत्पल हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांना शिवसेना-राष्ट्रवादी युतीने पाठिंबा दिला आहे. याशिवाय विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, रवी नाईक, चर्चिल आलेमाव हे वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत.

राजकीय घडामोडी - भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पक्षातील रुसवे फुगवे दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण येथे भाजपचे ४० पैकी २१ उमेदवार आयात केलेले आहेत.- आप आणि काँग्रेसने पक्षांतर-भ्रष्टाचार करणार नाही, अशी ‘शपथ’ उमेदवारांना घ्यायला लावली. गतवेळी १७ पैकी १० आमदार भाजपात पळून गेल्याने काँग्रेसने  उमेदवारांकडून शपथपत्रच लिहून घेतले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२goaगोवाElectionनिवडणूकPoliticsराजकारण