शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

सर्व मुलींना ‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी बॉयफ्रेंड आवश्यक! कॉलेजमध्ये लागली फेक नोटीस, पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 06:51 IST

एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी असलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पारादीप (ओडिशा) :

ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयाने संस्थेच्या सर्व विद्यार्थिनींना १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आधी बॉयफ्रेंड असणे अनिवार्य करण्याचे निर्देश देणाऱ्या बनावट नोटीसबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी असलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत प्राचार्य बिजय कुमार पात्रा म्हणाले, “आम्ही बनावट नोटीस पाहिली आहे. 

महाविद्यालयाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी...- काही उपद्रवी तत्त्वांनी ती व्हायरल केली आहे. आमच्या महाविद्यालयाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे केले गेले आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.” आपली प्रतिमा डागाळण्यासाठी आपल्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोपही मुख्याध्यापकांनी केला आहे. - जगतसिंगपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने मुख्याध्यापकांच्या तक्रारीची पुष्टी केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड नसेल, तर होईल कारवाई- ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मागेपुढे अशा प्रकारच्या बनावट नोटिसा व्हायरल करण्याचा फंडा तसा जुनाच आहे. - २०१८ मध्ये चंडीगड विद्यापीठाचा असाच एक आदेश व्हायरल झाला होता. त्यातही ‘जो कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशिवाय विद्यापीठात दिसेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि दंड आकारला जाईल, असा इशारा दिला होता. म्हणे हे सगळे सुरक्षिततेसाठी...- एसव्हीएम महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी असलेली नोटीस दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये विद्यार्थिनींना १४ फेब्रुवारीला त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत महाविद्यालयात येण्यास सांगण्यात आले, एवढेच नाही तर “हे सुरक्षेच्या उद्देशाने केले जात आहे.- विद्यार्थिनींना बॉयफ्रेंडसोबत क्लिक केलेला फोटो दाखवणेही आवश्यक आहे,’ असे फर्मानही त्यात सोडले आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांत घबराट निर्माण झाली. नोटीसच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. प्राचार्यांनी ही नोटीस बनावट असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.चौकशीत हे पत्र बनावट असल्याचे समोर आले. विद्यापीठातीलच एकाने बनावट पत्र टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. अर्थात त्याची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे