श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या येत्या २ डिसेंबरला होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार रविवारी थंडावला़ दुसऱ्या टप्प्यात फुटीरवादी राजकारणातून मुख्य प्रवाहातील राजकारणात आलेले सज्जाद लोन, तसेच विद्यमान सरकारमध्ये एकमेव महिला मंत्री असलेल्या सकिना इटू यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नशिबाचा फै सला होणार आहे़दुसऱ्या टप्प्यात १९ जागांसाठी मतदान होत आहे़ यापैकी उत्तर काश्मिरातील कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवारा मतदारसंघावर राजकीय विश्लेषकांच्या नजरा खिळल्या आहेत़ कारण या मतदारसंघातून सज्जाद लोन प्रथमच विधानसभा निवडणूक लढवीत आहेत़ सज्जाद लोन २००९ मध्ये फुटीरवादी गटातून वेगळे झाले होते़ नुकतीच झालेली लोकसभा निवडणूकही त्यांनी लढविली होती़ विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते़नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया ताणल्या होत्या़ मोदी आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे असल्याचेही यानंतर लोन सांगत सुटले होते़ या पार्श्वभूमीवर हंदवारा जागेवर आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता़ (वृत्तसंस्था)
सज्जाद लोन यांच्यावर सर्वांच्या नजरा
By admin | Updated: December 1, 2014 00:02 IST