शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या सर्व कंत्राटांचं वाटप नियमानुसारच; एनएचएसआरसीएलचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:04 IST

सर्व कंत्राटं पारदर्शक पद्धतीनं दिल्याचा दावा

मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित कंत्राटं नियमानुसारच देण्यात आल्याचा खुलासा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एनएचएसआरसीएल) केला आहे. भाजपाला देणग्या देणाऱ्या कंत्राटदारांना आणि कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित कामांची कंत्राटं देण्यात आल्याचं वृत्त काही वृत्त संकेतस्थळांनी दिलं होतं. यानंतर एनएचएसआरसीएलनं स्पष्टीकरण दिलं आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अतिशय पारदर्शकपणे निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेला सेंट्रल पब्लिक प्रोकरमेंट पोर्टल / एनएचएसआरसीएल संकेतस्थळ / वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. सर्वात कमी किमतीच्या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांनाच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाशी संबंधित कामांची कंत्राटं देण्यात आली, असा खुलासा एनएचएसआरसीएलनं केला आहे. गुजरातस्थित क्युब कन्स्ट्रक्शन इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला बडोदा स्थानक परिसरात कम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सिस्टम कॉम्प्लेक्ससाठी भाडेतत्त्वावर जमीन देण्यात आली. मात्र या कंपनीसोबतच आणखी चार कंपन्यांनीदेखील निविदा भरल्या होत्या अशी माहिती एनएचएसआरसीएलकडून देण्यात आली आहे. बुलेट ट्रेनशी संबंधित विविध इमारतींच्या उभारणीचं कंत्राट के. आर. सावनी नावाच्या कंत्राटदाराला मिळालं आहे. सावनी बडोदा स्थानकाच्या आसपास इमारतींची उभारणी करणार आहेत. मात्र सावनी यांच्यासोबच आणखी तीन कंत्राटदारांनीदेखील निविदा भरली होती, असं एनएचएसआरसीएलनं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत वाटवा ते साबरमती दरम्यान विविध कामांचं कंत्राट धनजी के. पटेल या कंत्राटदाराला मिळालं आहे. याबद्दलही एनएचएसआरसीएलनं खुलासा केला आहे. याच कामासाठी पटेल यांच्यासोबतच आणखी दोन कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या, अशी माहिती एनएचएसआरसीएलनं दिली आहे.  

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन