शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत आलमगिरी मशिदीची पुन्हा बांधणी

By admin | Updated: September 2, 2016 06:17 IST

अयोध्येमध्ये ३०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली आलमगिरी मशीद पुन्हा बांधली जाणार आहे. या मशिदीला तिच्या सध्याच्या अवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वापरण्यास धोकादायक ठरविलेले आहे.

अयोध्या : अयोध्येमध्ये ३०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली आलमगिरी मशीद पुन्हा बांधली जाणार आहे. या मशिदीला तिच्या सध्याच्या अवस्थेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने वापरण्यास धोकादायक ठरविलेले आहे. ही मशीद हनुमानगढी मंदिराच्या विश्वस्तांच्या मालकीच्या जागेवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने ही मशीद वापरण्यास धोकादायक असल्याचे जाहीर करून तेथे या इमारतीत प्रवेशास बंदी असल्याची सूचनाही चिकटवली होती. यानंतर लगेचच हनुमानगढी विश्वस्तांनी तिच्या फेरउभारणीसच केवळ मान्यता दिली व खर्चही उचलण्याची तयारी दाखविली असे नाही, तर मुस्लिमांनी तेथे नमाज पढण्यास यावे, असे आवाहनही केले आहे.अयोध्या नगरपालिका मंडळाने नुकताच तिच्या भिंतीवर ‘मशिदीत प्रवेशास बंदी’ अशी नोटीस चिकटवली. या नोटिशीमुळे स्थानिक मुस्लिमांच्या गटाने हनुमानगढीचे प्रमुख पुजारी महंत ग्यान दास यांना भेटून मशिदीची डागडुजी करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. या भेटीने मुस्लिमांना सुखद धक्काच बसला. मंदिर विश्वस्तांनी स्थानिक मुस्लिमांना केवळ मशीद पुन्हा बांधण्यासच परवानगी दिली असे नाही, तर त्यासाठीचा खर्चही उचलायची तयारी दाखविली. खुदा का घर‘मी आमच्या मुस्लीम बांधवांना मशिदीचा जीर्णोद्धार करून ती आमच्या खर्चाने पुन्हा बांधा; तसेच मशीद ही देवाचे स्थान (खुदा का घर) असल्यामुळे तेथे नमाज पढण्यास कोणताही आक्षेप घेतलेला नाही,’ असे महंत ग्यान दास यांनी सांगितले. दास हे रमझानच्या महिन्यात इफ्तारचेही आयोजन करीत असतात.मुगल सम्राट औरंगजेबाच्या संमतीनंतर आलमगिरी मशीद त्यांच्या जनरलने १७व्या शतकात बांधली. ही मशीद आणि ती उभी असलेली जागा अरगरा म्हणून ओळखले जाते. १७६५मध्ये नवाब शुजाउद्दौला यांनी मंदिराला ही जमीन दान दिली; परंतु मशिदीमध्ये नमाज पढणे सुरूच राहील या अटीवर. नमाज पढणे कमीकमी होत गेले. देखभालीअभावी ती पडीक झाली होती.