शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यांनी शिवपालना मंत्रिपदावरून हटवले, अन्य तीन मंत्र्यांनाही घरचा रस्ता

By admin | Updated: October 23, 2016 13:10 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी काका शिवपाल यादव यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. शिवपाल तसेच अन्य तीन मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ऑनलाइन लोकमत

 नवी दिल्ली,  दि 23 -   समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी  काका शिवपाल यादव यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. शिवपाल यांच्यासह अमर सिंग यांचे विश्वासू असलेल्या अन्य तीन मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 
रविवारी साकळी अखिलेश यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी झालेले मैनपुरीचे आमदार राजू यादव यांनी ही माहिती दिली. राजू यादव म्हणाले,  अमर सिंग यांची विश्वासू माणसे पक्षातील वातावरण बिघडवत आहेत. त्यामुळे अशा माणसे आपल्या मंत्रिमंडळात नकोत, असे या बैठकीत अखिलेश यांनी सांगितले. 
अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्यासह नारद राय, शादाब फातिमा आणि ओमप्रकाश सिंग यांना मंत्रिंमंडळातून डच्चू दिला आहे. त्याबरोबरच अमरसिंग यांच्या विश्वासू असलेल्या जया प्रदा यांनाही अखिलेश यांनी फिल्म विकास परिषदेवरून हटवले आहे.  गेल्या महिन्यात अखिलेश यांनी शिवपाल यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली होती. मात्र मुलायम सिंग यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा पाडला होता.