शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१० ते १५ वर्षांमध्येच पूर्ण हाेईल अखंड भारताचे स्वप्न, प्रगतीच्या वाटचालीत काेणी आडवे येऊ नये: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:13 IST

संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे.

हरिद्वार :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अखंड भारत हा  सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षांमध्येच स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण हाेईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.हरिद्वार येथील कनखल येथे श्री कृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रमात ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व गुरुत्रय मंदिराच्या लाेकार्पण साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. 

एका कार्यक्रमात बाेलताना त्यांनी अखंड भारताबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, संत आणि ज्याेतिष्यांच्या मते २० ते २५ वर्षांमध्ये अखंड भारत निर्माण हाेईल. ज्या गतीने भारताची वाटचाल सुरू आहे, ती पाहता एवढा कालवधी लागू शकताे. मात्र, आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिल्यास १० ते १५ वर्षांमध्येच भारत अखंड हाेईल. भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यात जे आडवे येतील ते नष्ट हाेतील. 

भारताच्या प्रगतीच्या प्रवासात सर्वांनी साेबत यावे, थांबविण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्यांना साेबत यायचे नाही, त्यांनी मार्गातून बाजूला व्हावे, असे भागवत यांनी परखडपणे सांगितले. 

गेल्या वर्षीही भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अखंड भारताबाबत मत मांडले हाेते. भारतापासून वेगळे झालेले पाकिस्तानसारखे राष्ट्र संकटात आहे. अखंड भारत हा शक्ती नव्हे तर हिंदू धर्माच्या माध्यमातूनच निर्माण हाेऊ शकताे, असे ते म्हणाले हाेते.

हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म-    माेहन भागवत म्हणाले की, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. हजार वर्षांपर्यंत सनातन धर्माला समाप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. -    मात्र, ते संपले. आपण व सनातन धर्म आजही तिथेच आहे. 

अहिंसेचा पुरस्कार मात्र हातात दंडुके घेऊनच-    आम्ही अहिंसेचा पुरस्कार करताे. आमच्या मनात द्वेष नाही.-    मात्र, जग शक्तीलाच मानते. त्यामुळे अहिंसेचा पुरस्कार हातात दंडुके घेऊनच हाेईल, असे माेहन भागवत म्हणाले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ