शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अकाली नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचार, पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:23 IST

पंजाबात ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या गुरदासपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुचासिंग लांगा यांच्यावर एका पोलीस हवालदार महिलेचे सुमारे एक दशकभर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंदीगढ : पंजाबात ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या गुरदासपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुचासिंग लांगा यांच्यावर एका पोलीस हवालदार महिलेचे सुमारे एक दशकभर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.लांगा हे २००७ ते २०१२ या काळात अकाली दल सरकारमध्ये कृषिमंत्री होते. या महिलेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावरआहे. संबंधित तक्रारदार महिलेने आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा एक व्हिडिओ शूट केला असून,त्याची क्लिप पोलिसांना देण्यात आली आहे. गुरदासपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरचरणसिंग बुल्लर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.एफआयआरमध्ये ३९ वर्षीय तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, लांगा यांची मुलगी सरबजितकौर आणि मी गुरदासपूर येथील बेबे नानकी कॉलेजात एकाच वर्गात शिकत होतो. २००९ मध्ये याछळाला सुरुवात झाली. पोलीस हवालदार असलेला आपला पती वारल्यामुळे अनुकंपा धर्तीवर नोकरी मिळावी यासाठी आपण आपल्या नातेवाईकांसह लांगा यांना भेटलो होतो.त्यांनी दोन दिवसांनी एकटीला भेटायला बोलावून आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. मी खूपविनवण्या केल्या. तुमच्या मुलीच्या वर्गात असल्यामुळे मी तुमच्या मुलीसारखीच आहे, असे सांगितले. पण त्यांनी काहीही ऐकले नाही. आपण म्हणू तसे न केल्यासउत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या ओळखीच्या गुंडांकरवीठार मारण्याची धमकी त्यांनीदिली, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.लांगा यांनी सोहल गावातील आपल्या मालकीचा भूखंड विकून ३० लाख हडप केले. आपल्याला केवळ ४.५ लाख रुपये दिले. त्याबद्दल तक्रार करताच, त्यांनी नंतर एका स्थानिक खासगी बँकेकडून आपणास ८ लाखांचे कर्ज मिळवून दिले. पण त्या आठ लाखांतील प्रत्यक्षात १ लाखच मला दिले, असा आरोपही या महिलेने केला आहे. (वृत्तसंस्था)हे तर षडयंत्र-माजी मंत्र्याचा दावालांगा हे ६१ वर्षांचे असून, ते शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे दोन दशकांपासून ज्येष्ठ सदस्य आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये ते निवडणूक हरले असले तरी माझा भागातील अकाली दलाचे ते प्रमुख नेते आहेत.त्यांनी आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असल्याचा दावा केला आहे. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आपल्या पक्षाला निवडणुकीत फटका बसावा यासाठी रचण्यात आलेले हे षड्यंत्र आहे.पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊ, तसेच न्यायालयात समर्पण करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हा