शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सलमानला सायकलिंगचे स्टंट शिकवणा-या अजय पडवळचा मृत्यू

By admin | Updated: July 13, 2017 12:08 IST

सलमान खानला सायकलिंगचे स्टंट शिकवणारा पुण्याचा प्रसिद्ध सायकलस्वार अजय पडवळचा मंगळवारी रात्री सायकलिंग करताना दुर्देवी मृत्यू झाला.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 13 - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला सायकलिंगचे स्टंट शिकवणारा पुण्याचा प्रसिद्ध सायकलस्वार अजय पडवळचा बुधवारी रात्री सायकलिंग करताना दुर्देवी मृत्यू झाला. लेह-लडाखच्या खारदुंग ला भागात रात्री आठच्या सुमारास अजयच्या सायकलला अपघात झाला.  सायकलिंग करताना तोल जाऊन अजय दगडावर आदळला. दुर्घटनेच्यावेळी अजयने डोक्यात हेल्मेट घातले होते. पण हेल्मेट असूनही अजयच्या डोक्याला जबर मार बसला. 
 
अजयसोबत असलेल्या सहका-यांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. अजयला ज्या रुग्णालयात नेण्यात आले त्याठिकाणी आवश्यक उपचारांची सुविधा नव्हती. त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवणे आवश्यक होते. पण प्रशासनाने आवश्यक परवानगी देण्यात वेळ काढल्याने त्याला उपचार मिळू शकले नाहीत असा आरोप अजयच्या मित्रांनी केला. अजयला तातडीने दिल्लीला हलवलं असत तर त्याचे प्राण वाचले असते असे अजयच्या मित्रांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
सलमान खान विनोद खन्नांना मानायचा "लकी"
सलमान खान बनणार ‘बजरंगी’!!
भारतीय अ‍ॅथलिट्सना सलमान खान देणार प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक
 
अजय पडवळ हे देशातल्या सायकलिंग क्षेत्रातल खूप मोठ नाव होतं. देशातल्या टॉप टेन माऊंटन बाइकर्समध्ये अजयच्या नावाचा समावेश व्हायचा. सलमानच्या गाजलेल्या "किक" सिनेमातील सायकलिंगचे अनेक स्टंट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अजयनेच सलमानला सायकलिंगचे हे स्टंट शिकवले होते. या सिनेमातील सायकलिंगचे अनेक स्टंट स्वत: अजयने केले होते. अजय आणि सलमानच्या शरीरयष्टीत मोठी तफावत असल्याने हे सीन्स करताना अजयला बॉडी पॅकिंगचा आधार घ्यावा लागला होता. 
 
अजय पडवळने 1 जुलैपासून मित्रांसोबत सायकलिंगचा प्रवास सुरु केला होता. ते लेहला जाणार होते. पण त्यांनी कारगिलला जायचे ठरवले. अजयची शेवटची फेसबुक पोस्ट 5 जुलैची आहे. त्यामध्ये त्याने आपण कारगिलला जात असून पुढचे काही दिवस संपर्कक्षेत्राच्या बाहेर असू असे म्हटले आहे. अजय सोबत गेलेली त्याची मैत्रिण आभा पंडितने सांगितले की, मंगळवारी सकाळी अजयने तो सायकने खारदुंग ला येथे जात असल्याचे सांगितले. दुपारी तीन-चारपर्यंत परत येऊ असे त्याने सांगितले होते. अजय वेळेत परतला नाही तेव्हा आम्ही त्याने ज्या दुकानातून  भाडयावर सायकल घेतली होती तिथे गेलो त्यावेळी आम्हाला त्याचा अपघात झाल्याचे समजले.