शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल -मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:46 IST

लष्कर स्थापनेचा ७२ वा दिन; छुपे युद्ध लढणाऱ्याचे कट उधळले गेले

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेले घटनेतील ३७० अनुच्छेद रद्द करणे हे ‘ऐतिहासिक पाऊल’ होते, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी त्याची प्रशंसा केली.

ते म्हणाले, ‘अनुच्छेद रद्द झाल्यामुळे पश्चिमेकडील देशाच्या आणि त्याच्यासाठी छुपे युद्ध लढणाºयाचे कट उधळले गेले.’ दहशतवादी कृत्ये सशस्त्रदले अजिबात सहन करणार नाहीत, असे नरवणे लष्कर स्थापनेच्या ७२ व्या दिन कार्यक्रमात येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर बोलताना म्हणाले. ‘जे दहशतवादाला चिथावणी देत आहेत त्यांना चोख उत्तर देण्याचे अनेक पर्याय आमच्याकडे असून, ते वापरण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही’, असे ते म्हणाले.

नरवणे म्हणाले, ‘अनुच्छेद ३७० रद्द करणे हे ऐतिहासिक पाऊल आहे. जम्मू आणि काश्मीरला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल. त्या पावलामुळे आमच्या पश्चिमेकडील शेजाºयाचे व त्याच्यासाठी छुप्यारीतीने युद्ध लढणाऱ्यांची कटकारस्थाने उधळली गेली आहेत.’प्रथमच पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व महिलेकडेभारतीय लष्कर दिनानिमित्त बुधवारी लष्करातील काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन जगाला घडवण्यात आले. बुधवारच्या संचलनाचे वैशिष्ट्य असे होते की, कॅप्टन तानिया शेरगिल यांनी पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अशा प्रकारचे नेतृत्व करणाºया त्या पहिला महिला ठरल्या आहेत. प्रत्येक १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी ब्रिटिशांचे शेवटचे कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून पदभार घेऊन लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ झाले होते. बुधवारी लष्कराचा ७२ वा लष्कर दिन होता व प्रथमच यात संरक्षणप्रमुख सहभाग नोंदवत होते.

टॅग्स :Article 370कलम 370Indian Armyभारतीय जवान