शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विमान कंपनीची माणुसकी!

By admin | Updated: April 20, 2017 00:23 IST

विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानातून उतरवले किंवा वर सामान ठेवण्याच्या जागेतून विंचू अंगावर पडणे अशा बातम्या वा अनुभव तुम्हाला आले

नवी दिल्ली : विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानातून उतरवले किंवा वर सामान ठेवण्याच्या जागेतून विंचू अंगावर पडणे अशा बातम्या वा अनुभव तुम्हाला आले असतील, परंतु या ताज्या बातमीमुळे विमान कंपन्यांबद्दलचे तुमचे मत चांगल्या अर्थाने बदलेल. एतिहाद विमान कंपनीने वयोवृद्ध जोडप्याला त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या नातवाची भेट घेता यावी, यासाठी पायलटने विमानाची दिशाच बदलली. मँचेस्टर विमानतळावर ही घटना घडली. एतिहाद कंपनीचे हे विमान होते. विमान धावपट्टीवर धावत असताना जोडप्याने मोबाइल फोन स्वीचड् आॅफ करण्यापूर्वी त्यांच्या जावयाने पाठवलेला मेसेज वाचला. जोडपे ३० मार्च रोजी अबू धाबीमार्गे आॅस्ट्रेलियाला जात होते. त्यांना समजले की त्यांचा नातू अती दक्षता विभागात असून, आपण तेथे असले पाहिजे, असे त्यांना वाटले अशी माहिती त्यांचा ट्रॅव्हल एजंट बेकी स्टीफनसन यांनी सांगितली. जोडप्याने ही माहिती विमानातील कर्मचाऱ्यांना सांगितली व त्यांनी ती कॅप्टनला. कॅप्टनने प्रवासी जेथून विमानात बसतात त्या प्रवेशद्वारापाशी विमान नेले, असे स्टीफनसन म्हणाले. दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी त्या जोडप्याचे सामान घेऊन त्यांना विमानतळावर जाण्यास मदत केली.पार्किंगमधून त्यांची कार आगमन प्रवेशद्वारापाशी आणण्यात आली म्हणजे ते थेट नातवाला भेटायला ती घेऊन जाऊ शकतील. दुर्दैवाने त्यांच्या नातवाचे दुसऱ्याच दिवशी निधन झाले. जोडपे विमानातून उतरल्यावर विमान रवाना झाले. माझ्या पक्षकाराच्या नातवाचे निधन झाले हे दुर्दैव. परंतु एतिहादने ज्या प्रकारे मदत केली ते उल्लेखनीय आहे, असे स्टीफ सन मदत केली त्याचे कौतकच करावे, असे स्टीफनसन यांनी म्हटले.