नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानात गुरुवारी एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. जेवणात पाल मिळाल्याचे छायाचित्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी उड्ड्यण मंत्री अशोक गजपती राजू यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. विमानाने दिल्ल्लीहून उड्डाण भरल्यानंतर प्रवाशांना जेवण देण्यात आले. यावेळी एका प्रवाशाने मागवलेल्या सलाद आणि बर्गरसोबत पालही असल्याचे लक्षात आले. संबंधित प्रवासी आणि विमानातील इतरही लोकांना जेवणात पाल बघून धक्का बसला. त्वरित याची तक्रार करण्यात आली. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी जेवणात पाल आढळल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एअर इंडियाच्या जेवणात पाल!
By admin | Updated: June 14, 2015 02:26 IST