शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

एअर इंडियाचे खासगीकरण व्हावे: सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 05:56 IST

विमान निर्मिती, दुरुस्ती, देखभालीमध्ये भारत स्वयंपूर्ण बनणार; ‘व्हिजन २०४०’मधून हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली ग्वाही

- खलील गिरकरमुंबई : भारताला २०४० पर्यंत हवाई वाहतूक क्षेत्रात विमान निर्मिती ते विमान दुरुस्ती, देखभालीमध्ये स्वयंपूर्ण बनवून जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट व्हिजन २०४०द्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी विमानसेवेच्या संबंधित कररचनेमध्ये बदल करण्यापासून डीजीसीएला स्वायत्तता देण्यापर्यंतच्या अनेक उपायांचा समावेश आहे. ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्वांनी एकत्रित येत काम करण्याची हाक केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ होत असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर ६ टक्के वाढ झाली आहे. भारत सध्या जगात १८७ दशलक्ष प्रवाशांसहित एव्हिएशन क्षेत्रात सातव्या क्रमांकावरील देश आहे. २०२२ पर्यंत हे स्थान तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास २०४० मध्ये भारतातील हवाई प्रवाशांची संख्या ६ पटीने वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील विविध विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात विमानांची आॅर्डर दिली जात असून सध्या १ हजार विमाने देशात येण्याचे बाकी आहे. सध्याच्या ६२२ विमानांची संख्या २०४० पर्यंत वाढून २३५९ होईल, असा अंदाज आहे.

देशातील कार्यरत विमानतळांची संख्या २०४० पर्यंत दोनशेवर जाईल. देशातील प्रमुख शहरांमध्ये दोन विमानतळे असतील व मुंबई, दिल्लीमध्ये तीन विमानतळे कार्यरत असतील. यासाठी १ लाख ५० हजार एकर जमीन लागणार असून आॅपरेशनल कामासाठी (जमीनीची किंमत वगळून) चाळीस ते ५० लक्ष डॉलर्स निधीची गरज भासेल.

हवाई मालवाहतूकीमध्ये वाढ होईल व २०४० पर्यंत १७ दशलक्ष टन मालवाहतूक केली जाईल. कार्गो वाहतूक प्रक्रिया पूर्णत: पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी केवळ एक ते दोन तास लागतील.

संपूर्ण दक्षिण आशियासाठी भारत हा ट्रान्सशिपमेंट हब बनेल. यासाठी सरकारतर्फे नभ निर्माण फंड उभारण्यात येईल. त्यासाठी सुरुवातीला कॉर्पस फंड म्हणून दोन बिलियन डॉलर्स निधी कमी वर्दळीच्या विमानतळांच्या विकासासाठी देण्यात येईल.एअर इंडियाचे खासगीकरण व्हावे’एव्हिएशन टर्बो फ्युएलला जीएसटीमध्ये सामिल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास, पर्यटन व पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल असे मत व्हिजनमध्ये नोंदवण्यात आले आहे.च्पांढरा हत्ती बनलेल्या एअर इंडियाचे लवकरात लवकर खासगीकरण होण्याची तीव्र निकड नमूद करण्यात आली आहे. तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करुन विमान दुरुस्ती व देखभाल, निमीर्ती अशा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया