शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्टेलच्या छतावर सापडला विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’, अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआरदेखील हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 08:07 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर २७ तासांनी शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरोला (एएआयबी) विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स बी. जे. मेडिकल कॉलेजच्या  वसतिगृहाच्या छतावर सापडला.

अहमदाबाद - अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर २७ तासांनी शुक्रवारी विमान अपघात तपास ब्युरोला (एएआयबी) विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) सापडला आहे. हा ब्लॅक बॉक्स बी. जे. मेडिकल कॉलेजच्या  वसतिगृहाच्या छतावर सापडला. या ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून अपघाताचे नेमके कारण शोधता येईल. अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर देखील सापडला आहे. 

आतापर्यंत २७० मृतदेह हाती लागले असून सात जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, ड्रीमलाइनर विमानांची तपासणी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यात २६ बोइंग ७८७-८ व ७ बोइंग ७८७-९ विमाने आहेत.  (वृत्तसंस्था)

मोदी यांनी घेतली विश्वासकुमार रमेश यांची भेटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात भेट देऊन विमान अपघातातील जखमी नागरिकांची विचारपूस केली. या भीषण दुर्घटनेतून वाचलेले एकमेव प्रवासी विश्वासकुमार रमेश यांचीही मोदी यांनी खास भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अपघातातील २५ जखमींवर सिव्हिल रुग्णालयातील सी१७ वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत. मोदी यांनी यावेळी डॉक्टरांशीही संवाद साधला.  

केंद्रीय तपास संस्थांची विमान दुर्घटनास्थळाला भेटराष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) इतर केंद्रीय तपास संस्थांनी शुक्रवारी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या स्थळाला भेट दिली. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी)ने  या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.   विमानाचे अवशेष तसेच विमान ज्या  इमारतीवर कोसळले तिची नासधूस झाल्याने पसरलेला ढिगारा या गोष्टी शुक्रवारी तिथून हटविण्यात आल्या. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख अजून पटू शकलेली नाही.   

अपघातस्थळाची  पंतप्रधानांकडून पाहणीएअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले,  त्या अपघातस्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाहणी केली. या दुर्घटनेतील जखमींची त्यांनी अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. ओळख पटलेल्या मृतांपैकी सात जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची  ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या सुरू आहेत. आतापर्यंत अपघातग्रस्तांपैकी १९२ कुटुंबांचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले आहेत.  

एअर इंडियाच्या विमानाचे फुकेतमध्ये इमर्जन्सी लँडिंगनवी दिल्ली : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून शुक्रवारी थायलंडच्या फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित विमानतळावर उतरल्यानंतर त्याची अनिवार्य सुरक्षा चाचणी केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इमर्जन्सी लँडिंग केलेल्या एअर इंडियाच्या ‘एआय ३७९’ विमानात १५६ पेक्षा अधिक प्रवासी होते. दिल्लीला येण्यासाठी या विमानाने उड्डाण केल्यांनतर काही वेळात सुरक्षा अलर्ट मिळाला. त्यानंतर विमानाच्या मार्गात बदल करत फुकेत येथे विमानाचे लँडिंग करण्यात आले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद